महाराष्ट्र
Trending

बीडचे पंचायत समिती कार्यालय चोरट्यांनी फोडले ! कार्यालयाला कुलूप ठोकून कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मीटिंगला, चोरटे पंचायत समितीत !

बीड, दि. २५ – कर्मचारी कार्यालयाला कुलूप लावून जिल्हा परिषदेच्या मीटिंगला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी पंचायत समितीचे कार्यालय फोडून चोरी केली. कार्यालयातील इन्वर्टर व दोन बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या. या चोरीमुळे बीडमधील सरकारी कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यासंदर्भात तालुका अभियान व्यवस्थापक रश्मी राधाकृष्ण गोसावी (नौकरी, पंचायत समीती बीड, रा. सारडा नगरी बीड) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, त्या पंचायत समिती बीड येथे तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून नौकरीस आहे.

दि.19/11/2022 रोजी तालुका अभियान व्यवस्थापक रश्मी राधाकृष्ण गोसावी व कार्यालयात काम करनारे राहुल आंबादास वाघमारे, राजेश हरिशचंद्र आदमे तिघेजण सकाळी 11:00 वा. सुमारास ऑफिसला कुलूप लावून जिल्हा परिषदेला  मिटींगला निघून गेले.

नंतर काही कामानिमित्त दि 20/11/2022 रोजी सकाळी 11:00 वाजेच्या सुमारास ते ऑफिसमध्ये परतले असता दरवाज्याला लावलेले कुलुप तुटलेले होते. तालुका अभियान व्यवस्थापक रश्मी राधाकृष्ण गोसावी व सहकार्यांनी आत जावून पाहिले असता आतमधे ठेवलेले ईन्व्हर्टर संच दिसून आला नाही.

चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ईन्व्हर्टर व दोन  बटरी चोरट्यांनी चोरून नेल्या.  दि.19/11/2022 रोजी 11:00ते दि. 20/11/2022 रोजी सकाळी 11:00 वाजे दरम्यान चोरट्यांनी हा डाव साधला. तालुका अभियान व्यवस्थापक रश्मी राधाकृष्ण गोसावी यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!