महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

ग्रामीण भागासह देशभरात उद्योग उभारण्यासाठी बँकाचे तरुणांना 12 लाखांहून अधिक कर्ज

एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2022 या काळात देशातील ग्रामीण भागात 12 लाखांहून अधिक कर्ज देण्यात आली

नवी दिल्‍ली, 12 डिसेंबर 2022

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2022 पर्यंत, देशभरातील ग्रामीण भागात 12 लाखांहून अधिक कर्जे वितरित करण्यात आली आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत किसनराव कराड यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

उद्योग उभारणी हा राज्याचा विषय असल्याचेही मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. तथापि, मंत्री पुढे म्हणाले की, ग्रामीण भागासह देशभरात उद्योग उभारण्यासाठी बँका तरुणांना कर्ज पुरवठा करत आहेत

भारतीय रिझर्व बँकेच्या  9 एप्रिल 2010  रोजीच्या परिपत्रकानुसार, व्याजदर आकारणी सह बँकांच्या सर्व पतसंबंधित बाबी नियंत्रणमुक्त करत

निधीचे मूल्य, मार्जिन, जोखीम अधिमुल्य यासारख्या संबंधित घटकांचा विचार करून आणि सध्याच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्या बँकेच्या स्वतःच्या कर्ज धोरणांअनुसार नियंत्रित केल्या जातात, असे मंत्र्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!