जुनी पेन्शन हक्क लढा सेनेच्या उद्याच्या आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली ! शिक्षकांनी आंदोलन केल्यास कडक कारवाईचा इशारा !!
औरंगाबाद, दि. २५ – जि.प. कार्यालयासमोर शिक्षकांची डी.सी.पी.एस. अंतर्गत झालेली कपात रक्कम संपूर्ण व्याजासह एन.पी.एस. खात्यावर वर्ग करावी या प्रमुख मागणीसाठी उद्या, २६ नोव्हेंबरचे नियोजित धरणे आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. उद्या एकूण चार रॅलीचे आयोजन असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता क्रांतीचौक पोलिसांनी वर्तवली असून हे धरणे पुढील काळात करण्याचे सूचवले आहे. याऊपरही हे आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याच इशाराही पोलिसांनी दिला आहे.
यासंदर्भात क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी जुनी पेंन्शन हक्क लढा सेनेचे जिल्हा समन्वयक अमोल बाबासाहेब एरंडे यांना आजच पत्र पाठवून या आंदोलनाची परवानगी नाकारली असल्याचे कळवले आहे.
या पत्रात नमूद करण्यात आले आहे की,आपण जि.प. कार्यालयासमोर शिक्षकांची डी.सी.पी.एस. अंतर्गत झालेली कपात रक्कम संपुर्ण व्याजासह एन.पी.एस. खात्यावर वर्ग करावी या प्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलन करण्याची परवानगी मागीतली आहे.पोलीस ठाणे क्रांतीचौक हद्दीत दि. २६/११/२०२२ रोजी एकूण चार रॅलीचे आयोजन असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी आपण आपले ‘धरणे आंदोलन’ हे पुढिल तारखेला करावे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५९ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे पो.स्टे. हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, पदयात्रा, जाहीर सभा जमाव, मिरवणुक, मोर्चा, निदर्शने यासंबंधी परवानगी बाबत प्राप्त अधिकाराअन्वये आपण मागितलेली दि. २६/११/२०२२ शनिवार रोजीची ‘धरणे आंदोलनाची’ परवानगी नाकारण्यात येत आहे.
आपली परवानगी नाकारण्यात आली असुन तरी देखील आपण आंदोलन करण्यावर ठाम आंदोलन केल्यास आपले व कार्यकर्ते यांच्या विरुध्द कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही या पत्रात म्हटले आहे.
नाईलाजाने हे आंदोलन पुढे ढकलावे लागणार – जुनी पेन्शन हक्क लढा सेना
जिल्हाभरातील दोन हजारांहून अधिक डीसीपीएस धारक शिक्षकांचे मार्च २०२१ नंतरच्या २० महिन्यांचे प्रत्येकी ७० ते ८० हजार रुपयांचे व्याज, जे की सुमारे २० कोटींच्या आसपासच्या रक्कमेची बुडवणूक केवळ आणि केवळ जिल्हा परिषद वित्त विभागाच्या कामचुकारपणामुळे होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या विरोधात बंड पुकारून जुनी पेन्शन हक्क लढा सेनेच्या वतीने या अन्यायाविरोधात उद्या दि.२६ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर दुपारी २ ते ५ या वेळेत तीव्र धरणे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची संपूर्ण तयारी संघटनेच्या वतीने पूर्ण झालेली असताना अचानकपणे क्रांती चौक पोलीस ठाण्याकडून जुनी पेन्शन हक्क लढाया सेनेच्या तीव्र धरणे आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. शासकीय कर्मचारी असल्याच्या मर्यादेमुळे नाईलाजाने हे आंदोलन यामुळे पुढे ढकलावे लागणार आहे.
मात्र अशाही परिस्थितीत जुनी पेन्शन हक्क लढा सेना यत्किंचितही स्वस्थ बसणार नसून या गंभीर बाबीचा अधिक सखोल अभ्यास करून यातील सर्व दोषी व सुस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईसह संपूर्ण व्याजाची रक्कम प्रत्येक अन्यायग्रस्त शिक्षक बंधू-भगिनींच्या खात्यात मिळेपर्यंत जुनी पेन्शन हक्क लढा सेना थांबणार नाही. लवकरच याबाबत पुढील आवश्यक ती सर्व कार्यवाही व वाटचाल राज्य समन्वयक दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक अमोलराजे एरंडे यांच्या नेतृत्वात अधिक सक्षमपणे करण्यात येणार आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट