महाराष्ट्र
Trending

सचखंड एक्स्प्रेसमध्ये द्वितीय आणि तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्याची कायम स्वरूपी वाढ !

नांदेड, दि. १३ – सचखंड एक्स्प्रेसमध्ये एक द्वितीय श्रेणी वातानुकुलीत आणि एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्याची कायम स्वरूपी वाढ  करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दक्षिण मध्य रेल्वे ने वातानुकुलीत डब्यातून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून हुजूर साहिब नांदेड-अमृतसर-हुजूर साहिब नांदेड सचखंड एक्स्प्रेस मध्ये एक द्वितीय श्रेणी वातानुकुलीत आणि एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्याची कायम स्वरूपी वाढ  करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे –

1. गाडी क्रमांक 12715 हुजूर साहिब नांदेड –अमृतसर सचखंड एक्स्प्रेस :

दिनांक 10 एप्रिल, 2023 ला हुजूर साहिब नांदेड येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 12715 हुजूर साहिब नांदेड –अमृतसर सचखंड एक्स्प्रेस मध्ये एक द्वितीय श्रेणी वातानुकुलीत आणि एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्याची कायम स्वरूपी वाढ  करण्यात येईल.

2. गाडी क्रमांक 12716 अमृतसर-हुजूर साहिब नांदेड सचखंड एक्स्प्रेस :

दिनांक 12 एप्रिल, 2023 ला अमृतसर येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 12716 अमृतसर – हुजूर साहिब नांदेड सचखंड एक्स्प्रेस मध्ये एक द्वितीय श्रेणी वातानुकुलीत आणि एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्याची कायम स्वरूपी वाढ  करण्यात येईल.

Back to top button
error: Content is protected !!