महाराष्ट्र
Trending

गंगापूर/वैजापूर: तलाठ्याच्या गाडीला स्कॉर्पिओ आडवी लावून वाळूचा हायवा पळवून नेणाऱ्या माफियाच्या वाळूज पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

औरंगाबाद, दि. ९ – तलाठ्याच्या गाडीला स्कॉर्पिओ आडवी लावून वाळूचा हायवा पळवून नेणाऱ्या माफियाच्या वाळूज पोलिसांनी मुसक्या आवळल्या. महसूल पथकाने अवैध वाळूचा हायवा पकडला. तो हायवा पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी घेऊन जात असताना चौघांनी तलाठ्यांच्या गाडीला स्कॉर्पिओ आडवी लावून हायवा पळवल्याची घटना दि.08/12/2022 रोजी रात्री 22.10 ते 00.30 वाजेदरम्यान मुरमी फाटा (शेंदूरवादा ता. गंगापूर, जि.औंरगाबाद) येथे घडली.

दीपक सुखासे (व इतर 05अनोळखी) असे आरोपीचे नाव आहे. ओपेंद्र रामराव देवकर (वय 48वर्ष, व्यवसाय – तलाठी पिपळखेंडा , रा.देवगिरी व्हील्स शिवाजीनगर ता. औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळूज पोलिस स्टेशनमध्ये गुरन नं .381/2022 कलम 353,341,143,147,149,506. भादवी.सह कलम 48(7) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुरमी फाटा शेंदूरवादा ता.गंगापूर,जि.औंरगाबाद येथे तलाठी ओपेंद्र रामराव देवकर व उपविभागीय अधिकारी वैजापूर यांचे पथक अवैध गौण खनिज कारवाई कामी मुक्तेश्वर साखर कारखाना येथून जात होते. त्यावेळी त्यांना विना क्रमांकाचा हायवा त्यामध्ये माती मिश्रित वाळु सह आढळून आला.

त्यांनी सदर हायवा चालकास थांबून वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याच्याकडे परवाना नव्हता. सदर चालकास विचारना करता त्याने हायवाचा मालक हा दिलीप सुखासे आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी हे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सदर हायवा तहसील कार्यालय गंगापूर येथे घेऊन जात असताना स्कार्पिओ गाडीतून चार अनोळखी लोकांनी सदर हायवा अडवला.

त्यानंतर तलाठी ओपेंद्र रामराव देवकर व तलाठी कानडे यांना दमदाटी करून हायवातील वाळू रस्त्यावर खाली करून हायवा व चालक यांना पळून जाण्यास मदत केली. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर हायवा चालकास व मालकास ताब्यात घेतले असून हायवा व स्काॅरपीयो गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलिस करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!