राष्ट्रीय
Trending

आदर्श नागरी पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे देवू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ – आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे देवू अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी भरगच्च पत्रकार परिषदेत केली.

संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०० कोटींच्या घोटाळ्यासंदर्भातील ठेवीदार आज , १६ सप्टेंबर रोजी आक्रमक झाले आहे. हजारो ठेवीदारांनी मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला होता. मोर्चेकरी आणि पोलिस यांच्यात ढकलाढकलीही झाली. यामुळे खासदार इम्तियाज जलील आक्रमकही झाले होते.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे ४५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या दरम्यान, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यासंदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खासदार इम्तियाज जलील हे मला भेटले होते. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देण्यात येतील अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका शब्दात केली.

मोर्चेकरी आणि पोलिसांत ढकलाढकली

संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०० कोटींच्या घोटाळ्यासंदर्भातील ठेवीदार आज आक्रमक झाले. मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा निघाला असता पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी मोर्चेकरी मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा नेण्यास ठाम होते. यामुळे पोलिस आणि मोर्चेकरी यांच्यात सौम्य ढकलाढकली झाली. मोर्चेकर्यांनी बॅरिगेडस बाजूला करून मोर्चेकरी मंत्रिमंडळ बैठकीकडे रवाना झाले. एकतर मोर्चा मंत्रिमंडळ बैठकीवर जाऊ द्या अन्यथा एका मंत्र्याने मोर्चेकर्यांचे निवेदन स्वीकारण्यास यावे यावर खा. इम्तियाज जलील ठाम होते.

भडकल गेट येथे मोर्चेकरी मोठ्या संख्यंने जमा झाले होते. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थे प्रथमदर्शनी २०० कोटींचा घोटाळा झाल्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. या पतसंस्थेतील ठेविदारांनी आज मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला. या मोर्चात खा. इम्तियाज जलील हेही सामिल झालेले आहेत. हा मोर्चा भडकल गेट येथून मंत्रिमंडळ बैठकीवर निघाला. मात्र, पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिस मोर्चेकर्यांना मंत्रिमंडळ बैठकीस जाण्यास मज्जाब करत आहेत.

मंत्र्यांना मोर्चेकर्यांना सामोरे जाण्यास जर वेळ नसेल तर आम्ही लाठ्या खायला तयार आहोत, असे पोलिसांना सुनावले. यावेळी मोर्चेकरी आणि पोलिसांत सौम्य ढकलाढकली झाली. मोर्चेकरी पोलिसांचे कडे आणि बॅरिगेड्स बाजूला करून मंत्रिमंडळ बैठकीकडे जाण्यावर ठाम होते. खा. इम्तियाज जलील यांनाही पोलिसांनी घेराव टाकला होता. ठेवीदार काहीही ऐकन्याच्या मनस्थितीत नव्हते. सरकारने ठेवीदारांच्या ठेवींची जबाबदारी घ्यावी, या मागणीवर ठेवीदार ठाम होते.

दरम्यान, खा. इम्तियाज जलील आणि पोलिसांत चर्चा झाली. आम्ही सर्व मोर्चेकरी आमखास मैदानावर थांबतो. तेथे मंत्र्याने यावे आणि मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारावे अन्यथा यापुढे मंत्री रस्त्यावर कसे फिरतात ते आम्ही मोर्चेकरी पाहून घेवू असा इशाराही यावेळी देण्यात आला. या मंत्र्यांना फाईव्हस्टार हॉटेलमध्ये लंच झोडायला वेळ आहे. कार्यकर्त्यांच्या घरी जेवनावळी घ्यायला वेळ आहे परंतू गोर गरीबांच्या बुडालेल्या ठेवीवर निर्णय घ्यायला वेळ नाही असा सवालही खा. इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आमखास मैदान येथे मोर्चेकर्यांना मंत्री गिरीष महाजन आणि दिलीप वळसे हे सामोरे गेले. त्यांनी मोर्चेकर्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.

Back to top button
error: Content is protected !!