बीड: मध्यरात्री एक वाजता गावात चोर शिरल्याचा कॉल आल्याने पोलिसांची धावपळ ! आष्टी स्टेशनचे पोलिस गावांत पोहोचले अन् पुढे काय झाले ?
बीड, दि. २५ – मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ११२ वरून पोलिसांना गावात चोर शिरल्याचा कॉल आला. पोलिसांचे पथक तातडीने गावात पोहोचले. थेट कॉलरच्या घरी दाखल झाल्यानंतर पोलिसांना कॉलर दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गावातील लोकांकडून माहिती घेतली असता चोर आले नसल्याचे त्यांना समजले. या सर्व गोंधळात पोलिसांचा किंमती वेळ वाया गेला. हा प्रकार आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री घडला.
यासंदर्भात पोलिस अंमलदार भरत बबन गुजर (पोलीस ठाणे आष्टी) यांनी दिलेली माहिती अशी की, ते बीजसांगवी बीट मध्ये मदतनीस म्हणून कामकाज करतात. दिनांक 24/11/2022 रोजी रात्री 22.00 ते दिनाक 25/11/2022 चे 05.00 पर्यंत रात्र गस्त कामी पोलिस अंमलदार भरत बबन गुजर व पोशि तरकसे यांची ड्युटी होती.
याशिवाय चेकिंग साठी पोउपनि सातव व चालक पोशि तांबे होते. सर्वजण जीप (क्रं MH-23 AF 0019) ने रात्र गस्त करीत असताना दिं 25/11/2022 रोजी सुमारे 00.57 मिनिटाने सरकारी वाहनात 112 वरून कॉल आला. कॉलर गौतम अर्जुन कांबळे (वय 34 वर्षे रा. पिंप्री आष्टी) याने कॉल करून कळवले की, गावात चोर आले आहेत.
पोलीस मदत हवी आहे. त्यावरून पोलिसांनी कॉलर गौतम अर्जुन कांबळे याच्या राहते घरी जाऊन त्याची समक्ष भेट घेतली. 112 वर दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने सहानिशा करत असताना कॉलर हा दारूच्या नशेत असल्याचे दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी गावातील इतर लोकांना विचारपुस केली असता चोर आले नसल्याबाबत सांगितले.
कॉलरने दारूच्या नशेत खोटी माहीती देवून प्रशासनाचा विनाकारण वेळ वाया घातला म्हणून गौतम अर्जुन कांबळे यांच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट