राष्ट्रीय
Trending
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3.75 टक्के वाढ करण्यास मंजुरी, एकूण भत्ता आता 31 टक्के !
बेंगळुरू, 7 ऑक्टोबर – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3.75 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली.
सध्या कर्नाटक सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या २७.२५ टक्के महागाई भत्ता मिळतो, तो वाढून ३१ टक्के झाला आहे.
महागाई भत्त्यात वाढ झाल्याने सरकारी तिजोरीवर 1,282.72 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केले की, “… मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 1 जुलै 2022 पासून सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3.75% वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर 1,282.72 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
अलीकडेच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली होती.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट