महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविकेची गळफास घेऊन आत्महत्या ! जालन्यातील अंगणवाडीतच घेतला गळफास !!

जालना, दि. 11 नोव्हेंबर –अंगणवाडी सेविकेने अंगणवाडी शाळेच्या रुममध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली हे अजून स्पष्ट झालेले नसून पोलिस त्याचा तपास करत आहेत. जालना जिल्ह्यातील  बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ येथे ही घटना घडली.

सावित्रा सोपान शिंदे (वय 33 वर्ष रा. ढोकसाळ ता. बदनापूर जि. जालना) असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलीस पाटील नरहरी यादवराव पवार (वय 56 वर्ष व्यवसाय शेती व पोलीस पाटील रा. ढोकसाळ ता जि.जालना) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, आज दि.11/11/2022 रोजी 14.00 वाजेच्या सुमारास ते त्यांच्या शेतात होते.

त्याचवेळी नरहरी पवार यांना गावातील गोवर्धण शिवाजी वाघ यांनी फोन करून कळविले की गावातील अंगनवाडी सेविका सावित्रा सोपान शिंदे (वय 33 वर्ष रा. ढोकसाळ ता. बदनापूर जि. जालना) हिने ढोकसाळ येथील अंगणवाडी शाळेच्या रुममध्ये रुमच्या स्लॅपच्या हुकला दोरीने गळफास घेतला आहे.

ही माहिती मिळताच पोलिस पाटील नरहरी पवार सदर ठिकाणी गेले. तेथे अगोदरच ग्रामस्थ जमा झालेले होते. पोलिस पाटील नरहरी पवार यांनी ही माहिती तातडीने पोलीस ठाणे बदनापूर यांना दिली.

ही माहीती मिळताच पोलीस ठाणे बदनापूर बिट अंमलदार ASI सय्यद, पोहेकाँ दासर असे घटनास्थळी दाखल झाले. सदर महिलेला खाली घेवून ग्रामीण रुग्णालय बदनापूर येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

 

 

Back to top button
error: Content is protected !!