महाराष्ट्र
Trending

बिडकीनला दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली पैठण, सिल्लोड तालुक्यातील टोळी तलवारीसह पकडली, जावेद उर्फ सरपंचसह दोघे पसार !

औरंगाबाद, दि. ९ – दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना बिडकीनच्या पोलिसांनी मोठ्या शिताफिने पकडले. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. सहा जणांपैकी दोघे पसार झाले तर चौघांना पकडले. त्यांच्या ताब्यातून तलवार, कटर, मिरची पूड यासह धारदार शस्र पोलिसांनी जप्त केली.

शाहरुख अख्तर शाह (वय 22 वर्षे रा. हिवाळे गल्ली बिडकीन), शेख मोहम्मद शेख मन्ना (33, रा. सागरनगर बिडकीन), समाधान यादव बोरुडे (28, रा. मंगरुळ ता. सिल्लोड), हबीब इसा बागवान (55, बागवान गल्ली बिडकीन ता. पैठण) अशी संशयितांची नावे आहेत. तर जावेद उर्फ सरपंच (रा. बिडकीन), आजीम बागवान (रा. बिडकीन) या दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन धूम ठोकली.

यासंदर्भात बिडकीन पोलिस ठाण्याचे पोना संदिप काकासाहेब धनेधर यांनी दिलेली माहिती अशी की, दि. 09/12/2022 रोजी 00.05 वाजता बिडकीन शहरात नाईट गस्त सुरु होती. पोना संदिप काकासाहेब धनेधर यांच्यासोबत पोअं चौधरी खाजगी वाहनाने गस्तीवर रवाना झाले. 00.50 वाजे दरम्यान डिलक्स पार्क बिडकीनमध्ये पेट्रोलिंग करीत असताना रस्त्याने बिडकीन ते औरंगाबाद रोडच्या बाजुने पाच ते सहा लोक संशयित रित्या फिरताना दिसून आले.

पोलिसांनी त्यांना थांबण्यासाठी सांगितले असता ते पळून जावू लागले. त्यामुळे पोना संदिप काकासाहेब धनेधर यांनी तातडीने प्रभारी अधिकारी सपोनि संतोष माने यांना फोनद्वारे माहीती दिली. थोड्या वेळात सपोनि माने, पोना गायकवाड त्याठिकाणी खाजगी वाहनाने आले. पोलिसांनी पळून गेलेल्या संशयितांचा डिलक्स पार्क परिसरात शोध घेतला. तेथिल जिमच्या पाठीमागील बाजुला गवतामध्ये अंधारात काही जण दबा धरून बसलेल्या अवस्थेमध्ये मिळून आले.

त्यांच्यातील चार जणांना ताब्यात घेतले. इतर दोन जण अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. पकडलेल्या चौघांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. शाहरुख अख्तर शाह (वय 22 वर्षे रा. हिवाळे गल्ली बिडकीन), शेख मोहम्मद शेख मन्ना (33, रा. सागरनगर बिडकीन), समाधान यादव बोरुडे (28, रा. मंगरुळ ता. सिल्लोड), हबीब इसा बागवान (55, बागवान गल्ली बिडकीन ता. पैठण) अशी त्यांनी त्यांची नावे सांगितली. पोलिसांनी या सर्वांची अंगझडती घेतली.

शाहरुखच्या ताब्यात एक लोखंडी तलवार अंदाजे 24 ते 25 इंच लांबी असलेली व पॅन्टच्या उजव्या बाजुचे खिशात एक मिरची पावडरचे पाकीट मिळून आले. शेख मोहम्मद शेख मन्ना याच्या ताब्यात एक लोखंडी टॉमी, समाधान यादव बोरुडे याच्या ताब्यात तीक्ष्ण धारदार लोखंडी कटर, हबीब इसा बागवान याच्या ताब्यात स्क्रुड्रायवर व पॅन्टच्या खिशामध्ये एक लोखंडी तीक्ष्ण धारदार कटर आदी दरोडा घालण्याचे घातक हत्यार व साहित्य मिळून आले.

पोलिसांनी त्यांना विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पळून गेलेले पळुन गेलेल्या दोघांची नावे जावेद उर्फ सरपंच (रा. बिडकीन), आजीम बागवान (रा. बिडकीन) असे असल्याचे सांगितले. पोना संदिप काकासाहेब धनेधर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिडकीन पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!