महाराष्ट्र
Trending

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नका, लेखी आदेश काढले: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४- शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये, असे लेखी आदेश काढण्यात आले आहेत. याशिवाय एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट आणि 3 हेक्टर पर्यंत मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. 65मिमी निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत देण्याचा निर्णय सततच्या पावसासंदर्भात घेण्यात आला. सुमारे 7000कोटी रुपयांची मदत आतापर्यंत देण्यात आली. ही मदत आणखी वाढणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे भेटले. मंत्री अतुल सावे, अब्दुल सत्तार यावेळी उपस्थित होते.

सोयाबीन उत्पादन खर्च, निर्यात धोरण तसेच आयात शुल्क वाढ, यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती, सोयाबीनचा वायदे बाजारात समावेश, जीएसटीचे प्रश्न, कृषि कर्जाला सी-बिल, पीकविमा, वीज इत्यादी बाबतीत विविध प्रश्न त्यांनी मांडले.

कृषि कर्जाला सी-बिल लागणार नाही, यासाठी तत्काळ एसएलबीसीची बैठक घेण्यात यावी, असे निर्देश देतानाच कृषिपंप सौर उर्जेवर आणण्याच्या योजनेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट आणि 3 हेक्टर पर्यंत मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. 65मिमी निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत देण्याचा निर्णय सततच्या पावसासंदर्भात घेण्यात आला. सुमारे 7000कोटी रुपयांची मदत आतापर्यंत देण्यात आली. ही मदत आणखी वाढणार आहे.

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये, असे लेखी आदेश काढण्यात आले आहेत. इतर केंद्र सरकारशी संबंधित विषयांवर केंद्र सरकारसोबत तुमची बैठक आयोजित करण्यात येईल, कारण गेल्यावेळी अशाच बैठकीचा चांगला लाभ झाला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.

Back to top button
error: Content is protected !!