महाराष्ट्र
Trending

अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस खांडवा-भुसावळ कॅार्ड-अकोला-पूर्णा मार्गे वळवली !

Story Highlights
  • ही गाडी बेंगलोर केंट या रेल्वे स्थानकावरून धावणार नाही

नांदेड, दि.५- ब्लॉकमुळे दिनांक 4 आणि 5 डिसेंबर-2022 रोजी अमृतसरहून सुटलेली गाडी क्रमांक 12716 अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस खांडवा-भुसावळ कॅार्ड-अकोला-पूर्णा मार्गे वळवण्यात आली आहे.

मध्य रेल्वे मधील जळगाव रेल्वे स्थानकावर यार्ड रेमोडेलींग चे कार्य पूर्ण करण्याकरिता ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे दिनांक 4 आणि 5 डिसेंबर-2022 रोजी अमृतसरहून सुटलेली गाडी क्रमांक 12716 अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस खांडवा-भुसावळ कॅार्ड-अकोला-पूर्णा मार्गे वळवली आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वे मधील बंगलोर विभागात येलहांका रेल्वे स्थानकाजवळ भुयारी रेल्वे पुलाचे कार्य करण्याकरिता ब्लॉक घेण्यात आला आहे , यामुळे दिनांक 5 डिसेंबर, 2022 रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 16594 नांदेड-बेंगलोर एक्स्प्रेस येशवंतपूर – माल्लेस्वरम  मार्गे वळविण्यात आली आहे, यामुळे ही गाडी बेंगलोर केंट या रेल्वे स्थानकावरून धावणार नाही.

Back to top button
error: Content is protected !!