महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश ! मंत्रिमंडळात लवकरच निर्णय घेणार !

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : महिला व बालविकास विभागात अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ व इतर मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनाबाबत नुकत्याच आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री लोढा बोलत होते.

यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपसचिव वि. रा. ठाकुर, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम.ए.पाटील, दिलीप उटाणे, आरमाइर इराणी, अतुल दिघे, राजेश सिंग, संगीता कांबळे, दत्ता देशमुख यावेळी उपस्थित होते. मागील आठवड्यात ही बैठक पार पडली.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यातील एक लाख 10 हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून राज्यातील बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करत आहेत.

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढ तसेच विविध प्रश्नांबाबत शासन संवेदनशील आहे. मानधन वाढीचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे याबाबतीत विभागाने प्रस्ताव पाठवावा त्यावर मंत्रिमंडळात निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!