महाराष्ट्र
Trending

हर्सूल सावंगी येथील महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ 16 हजारांची लाच घेताना पकडला !

Story Highlights
  • नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी घेतली लाच.

औरंगाबाद, दि. 23 – प्लॉटवर नवीन मीटर बसवण्यासाठी 16 हजार 200 रुपयांची लाच घेतना हर्सूल सावंगी (जि. औरंगाबाद) येथील वरिष्ठ तंत्रज्ञ यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बुधवार, 23 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

साहेबराव बाबाराव घुगे (वय 34 वरिष्ठ तंत्रज्ञ म रा वि वि उपविभाग ग्रामीण क्रमांक 1 हर्सूल सावंगी औरंगाबाद रा रो हा.न डी 2 श्रीकृष्ण रेसिडेन्सी पिसादेवी ता जी औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी त्यांच्या प्लॉटवर शेडचे बांधकाम केले आहे. त्याठिकाणी नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ साहेबराव बाबाराव घुगे यांनी तक्रारदार यांच्याकडे दि. 22/11/2022 रोजी 16200 रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर दिनांक 23/11/2022 रोजी लाचेची रक्कम 16200 रुपये पंच साक्षीदार समक्ष स्वीकारली.

ही कारवाई संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, मारूती पंडित, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप राजपूत तर सापळा पथक – पोलीस अंमलदार सुनील पाटील, केवल गुसिंगे, दत्ता होरकटे ला.प्र.वि,औरंगाबाद यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!