महाराष्ट्र
Trending

औरंगाबाद रोडवरील जय बालाजी पेट्रोल पंपाकडून लाच घेताना पाचोऱ्याचा निरीक्षक सापळ्यात अलगद अडकला !

जळगांव, दि. 23 – औरंगाबाद रोडवरील जय बालाजी पेट्रोल पंपावर असलेल्या नोझल मशिनची स्टॅम्पींग करून प्रमाणपत्र देण्यासाठी सहा हजारांची लाच घेताना पाचोरा वैध मापनशास्त्र विभागाच्या निरीक्षकास पकडण्यात आले. जळगाव ला. प्र. विभागाने ही कारवाई केली.

विवेक सोनु झरेकर (वय ५४, व्यवसाय नोकरी, निरीक्षक वैध मापनशास्त्र विभाग, पाचोरा ता. पाचोरा जि. जळगांव ह.मु.पुणगांव रोड, गजानन महाराज मंदिराच्या पाठिमागे पाचोरा. मुळ रा. साकोरी, नगर मनमाड रोड, ता. राहता जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यातील तकारदार यांचा औरंगाबाद रोडवर जय बालाजी नावाने पेट्रोल पंप आहे. सदर पेट्रोल पंपावरिल ०४ नोझल मशिनीची स्टॅम्पींगची मुदत दि.०८.१०.२०२२ रोजी संपलेली होती. त्याअनुषंगाने तक्रारदार यांच्या वतीने त्यांचा भाऊ यांनी दि.१२.१०.२०२२ रोजी वैधमापन शास्त्रविभाग, पाचोरा कार्यालयात ऑनलाईन अर्ज सादर करून, स्टॅपींगचे कामासाठी लागणा-या ३०, ५०० /- रु. शासकिय रकमेचा चलनाद्वारे ऑनलाईन भरणा केला होता.

त्यानंतर तक्रारदार यांनी दि.०४.११.२०२२ रोजी पाचोरा विभागातील वैधमापन कार्यालयात जावुन झरेकर, निरीक्षक यांची भेट घेउन त्यांना त्यांचे पेट्रोल पंपावरील गिल्बर्को कंपनीचे ०२ व टोकेम कंपनीचे ०२ असे एकूण ०४ नोझल मशीनची स्टॅम्पींग कोणत्या दिवशी करणार या बाबत विचारणा केली.

यावर झरेकर यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुमच्या पेट्रोल पंपावर असलेल्या नोझल मशिनची स्टॅम्पींग करुन देण्यासाठी मी दि. २२.११.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास येणार आहे. तुम्हाला मला शासकिय फि व्यतिरिक्त ०१ नोझल मशिनचे १५०० /- रु. या प्रमाणे ०४ नोझल मशिनचे एकूण ६,०००/- रु. द्यावे लागतील, असे सांगितले.

दरम्यान, झरेकर, निरीक्षक यांनी तक्रारदार यांचे पेट्रोल पंपावरील एकूण ०४ नोझल मशिनची स्टॅम्पींग करुन तपासणीचे प्रमाणपत्र देण्याचे मोबदल्यात तक्रारदार यांचेकडेस शासकिय फि ३०,५०० /- रुपये व्यतिरिक्त ६,०००/- रु. लाचेची मागणी केल्याने त्या बाबत तक्रारदार यांनी दि.२२.११.२०२२ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, जळगाव कार्यालयाकडे तक्रार दाखल दिली.

सदर तक्रारीची अॅन्टी करप्शन ब्युरो, जळगांव पथकाने दि. २२.११.२०२२ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील नमुद विवेक सोनु झरेकर, निरीक्षक वैध मापनशास्त्र विभाग, पाचोरा ता. पाचोरा जि.जळगांव यांनी फिर्यादी यांच्या पेट्रोल पंपावरील स्टॅम्पींगचे काम करुन देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष ६,०००/- रुपये लाच रकमेची मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारली.

Back to top button
error: Content is protected !!