महाराष्ट्र
Trending

अंबडमध्ये मिरवणुकीदरम्यान खांद्यावर बसून पिस्टलसह डान्स ! 700 ते 800 लोक जमले असताना पोलिसांकडून पिस्टल जप्त !

आकाशाकडे पिस्टल फायरिंग स्थितीत हातात धरून मिरवणुकीत दहशत निर्माण केल्याचा आरोप

जालना, दि. 21 – टिपु सुलतान जयंती मिरवणुकीदरम्यान खांद्यावर बसून एका हातात आकाशाकडे पिस्टल फायरिंग स्थितीत हातात धरून मिरवणुकीत दहशत निर्माण केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  मिरवणुकीत 700 ते 800 लोक एकत्रीत जमले असताना पिस्टलच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याचा आरोप पोलिसांनी त्याच्यावर ठेवला आहे.

शेख बिलाल शेख दिलावर (वय 25 वर्षे, रा बळेगाव, ह.मु. महेबुबनगर, अंबड जि जालना) असे आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात पोहेकॉ विष्णु शंकरराव चव्हाण यांनी माहिती दिली की, दिनांक 20/11/2022 रोजी 15:00 वाजेपासुन अंबड येथे टिपु सुलतान जयंती मिरवणुक बंदोबस्त लावण्यात आला होता. मिरवणुकीत काही अनुचीत गुन्हा घडु नये याकरीता पोलीस निरीक्षक यांच्या सोबत 03 अधिकारी व 26 पोलीस अंमलदार नेमण्यात आले होते.

मिरवणुकीत 700 ते 800 लोक एकत्रीत जमले होते. मिरवणुक शांततेत येते असताना 19:00 वाजेच्या सुमारास अचानक एक जण दुसऱ्याच्या खांद्यावर बसून एका हातात आकाशाकडे पिस्टल फायरिंग स्थितीत हातात धरली. मिरवणुकीत नाचत असताना पोलिसांना संशयितरित्या तो दिसून आला.

त्याचे वर्तन हे सार्वजनिक ठिकाणावरील मिरवणुक पाहण्यासाठी जमलेल्या जमावातील लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी या उद्देशाने दिसून आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलिसांनी तात्काळ बंदोबस्ताचे स्टफ पोहेअ मुळक, पोहेअ कड, पोक गोफणे, पोअ  पवार यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले.

त्याच्या हातातील पिस्टल ताब्यात घेतली. शेख बिलाल शेख दिलावर (वय 25 वर्षे रा बळेगाव ह.मु. महेबुबनगर, अंबड) असे त्याने त्याचे नाव पोलिसांना सांगितले. तो मिल्ट्री मध्ये नोकरीस असल्याचे पोलिसांना त्याने सांगितले. त्याने त्याचे जवळचे अग्नीशस्त्राचा असलेला परवानाही पोलिसांना दाखवला. पोलिसांनी सदर ठिकाणी दोन पंचासमक्ष पिस्टल जप्त करून ताब्यात घेतले.

महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जमाबंदी व शस्त्रददी लागू करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लघन केले म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!