महाराष्ट्र
Trending

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांना पितृशोक

मनोहरराव गोंदावले यांचे निधन

औरंगाबाद : राज्य शासनाच्या वजने व मापे विभागाचे सेवानिवृत्त उपायुक्त मनोहरराव गोंदावले (वय ८८) यांचे सोमवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी औरंगाबाद येथे निधन झाले.

ते मूळचे गोंदवले (ता.माण जि.सातारा) येथील रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांचे ते वडील होत.

Back to top button
error: Content is protected !!