महाराष्ट्र
Trending

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे होणार पडताळणी, वेतन पडताळणी पथकाचा मराठवाडा दौरा !

Story Highlights
  • सेवापुस्तकात 20 जानेवारी, 2001 च्या वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार सोबतच्या जोडपत्राप्रमाणे परिपूर्ण पुर्तता करून जोडपत्र सेवापुस्तकात जोडणे आवश्यक आहे.

औरंगाबाद, दि.21,  :- सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पडताळणी करण्यासाठी वेतन पडताळणी पथक मराठवाड्यात येत असून औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील व तालुका स्तरीय सर्व कार्यालयांसाठी 22 ते 25 नोव्हेंबर तर लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांसाठी 26 ते 30 नोव्हेंबर असा कालावधी राहणार आहे. दौऱ्याचे ठिकाण वेतन पडताळणी कार्यालय, औरंगाबाद असणार आहे.

औरंगाबाद मुख्यालयी दौऱ्याच्या ठिकाणी 31 मार्च 2023 पर्यंत सेवानिवृत्त होणारे व झालेले अधिकारी तसेच कर्मचारी तसेच न्यायालयीन,लोकायुक्त प्रकरणे यांचे मुळ सेवापुस्तके प्राधान्याने निकाली काढण्याच्या दृष्टीने दौरा कार्यक्रम आयोजित केला आहे.

मराठवाडा विभागातील सर्व कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या कार्यालयातील 31 मार्च 2023 पर्यंत सेवानिवृत्त होणार व झालेले अधिकारी व कर्मचारी यांची मुळ सेवापुस्तके पडताळणीसाठी प्राधान्याने दाखल करावीत,असे आवाहन करण्यात आले आहे.

सेवापुस्तकात 20 जानेवारी, 2001 च्या वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार सोबतच्या जोडपत्राप्रमाणे परिपूर्ण पुर्तता करून जोडपत्र सेवापुस्तकात जोडणे आवश्यक आहे.

सेवापुस्तके पडताळणीसाठी दाखल करताना शासन निर्णय वित्त विभाग 14. मे 2019 नुसार वेतनिका प्रणालीमार्फत वेतन पडताळणी पथकाकडे तपासणीसाठी सादर करावयाचे आहे. त्याशिवाय मुळ सेवापुस्तके स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.

अधिकारी तसेच कर्मचारी यांनी सेवाज्येष्ठतेनुसार मिळालेली प्रत्यक्ष पदोन्नती नाकरलेली असल्यास तसेच कालबद्ध आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ दिलेल्या अधिकारी तसेच कर्मचारी यांनी त्यानंतर प्रत्यक्ष दिलेली पदोन्नती नाकारली असल्यास त्याबाबतची नोंद त्यांच्या मुळ सेवापुस्तकात घेणे आवश्यक असल्याचे लेखा व कोषागरे औरंगाबाद विभागाचे सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांनी कळविले आहे.

Back to top button
error: Content is protected !!