महाराष्ट्र
Trending

हॉटेल ताज, हर्सूल टी पॉईंट ते विमानतळपर्यंतचा रस्ता गुळगुळीत करण्याचे आदेश ! अतिक्रमण काढण्याचेही दिले निर्देश !!

जी-20 परिषद पार्श्वभूमीवर प्रशासकांची पाहणी

औरंगाबाद, दि. २९- आगामी काळात शहरात होणारी जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी ताज हॉटेल पासून ते विमानतळ पर्यंत या रस्त्यांची पाहणी करून रस्ता गुळगुळीत करण्याचे आदेश त्यांनी दिले. यासह या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधीतांना दिले.

पाहणी दौऱ्याची सुरुवात ताज हॉटेल पासून सुरू झाली तर हर्सूल टी पॉइंट मार्गे जळगाव हायवे, सिडको बस स्टॅन्ड ते विमानतळ आणि विमानतळापासून हॉटेल रामा इंटरनॅशनल समोर या पाहणी दौऱ्याची सांगता करण्यात आली.

सदरील मार्गावरील वाहतूक बेट सौंदर्यकरण करणे, रस्ता दुभाजक सौंदर्यकरण करणे, दुभाजक आणि रोडच्या कडेला माती उचलून घेणे, या मार्गावरील ज्या त्या ठिकाणी मलबा पडलेला आहे तो मलबा उचलणे तसेच सदरील मार्गावरील ग्रीन बेल्ट विकसित करणे, फुटपाथ विकसित करणे व त्यांचे सौंदर्यकरण करणे तसेच सिडको उड्डाण पुलावर रोषणाई करणे, पिरामिड स्क्वेअर ची रंगरंगोटी करणे, दिल्ली गेटची साफ सफाई करणे आणि हॉटेल ताज ते विमानतळपर्यंत या मार्गावरील अतिक्रमण काढून घेणे अशा सूचना प्रशासक डॉक्टर चौधरी यांनी यावेळी केल्या.

सदरील पाहणी दौऱ्यात शहर अभियंता एस डी पानझडे, कार्यकारी अभियंता बी डी फड, एम बी काजी, डी के पंडित, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, उपायुक्त तथा सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 04 राहुल सूर्यवंशी, वॉर्ड अभियंता फारुख खान, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शाहेद शेख आदींची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!