महाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: अधिसभा निवडणूक पहिला टप्पा ! राखीव गटातील पाच जागांचे निकाल जाहीर, जाणून घ्या कुणाला किती मते मिळाली !!

औरंगाबाद, दि.२८:  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील पाच राखील जागांचे निकाल मंगळवारी दि.२८ दुपारी जाहीर झाले. या विजयी उमेदवारांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. खुल्या प्रवर्गातल जागांची प्रत्यक्ष मतमोजणी मंगळवारी दुपारी ४ वाजता सुरु करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील अधिसभा निवडणुकीसाठी ५०.७५ टक्के मतदान झाले होते. एकूण ३६ हजार २५४ मतदारांपैकी १८ हजार ४०० पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव डॉ भगवान साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागातील बॅडमिंटन सभागृहात सोमवार व मंगळवारी मतमोजणी झाली.

बेगमपुराचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्यासह मतमोजणी केंद्रास बंदोबस्त दिला. मतमोजणीसाठी प्रत्येक शिफ्टला ४० प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण १२० जण नेमण्यात आले. सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर,डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. चेतना सोनकांबळे, वाल्मिक सरवदे, डॉ.संजय सांभाळकर, डॉ.आनंद देशमुख हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

मतमोजणीच्या कक्षात मंगळवारी (दि.२८) प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ .भगवान साखळे यांच्यासह निवडणुक समितीचे कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, डॉ. प्रकाश पापडीवाल, डॉ.सतीश पाटील, डॉ.राम चव्हाण, डॉ.नंदीता पाटील, डॉ. भारती गवळी डॉ. प्रवीण यन्नावार, डॉ.कैलास पाथ्रीकर,, उपकुलसचिव डॉ.विष्णु क-हाळे, दिलीप भरड, संजय कवडे, प्रताप कलावंत, आदींची उपस्थिती होती. डॉ.पुरुषोत्तम देशमुख, डॉ.कैलास अंभुरे व व डॉ. पराग हासे यांनी निवडणूक प्रक्रियेचे संचलन केले .

या निवडणूकीत प्रवर्ग निहाय विजयी झालेले उमेदवार, त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :- सुनील यादवराव मगरे (अनुसूचित जाती प्रवर्ग) – ८ हजार ९३६ मते, सुनील पुंडलिकराव निकम (अनुसूचित जमाती प्रवर्ग) ८ हजार ५१ मते, राऊत सुभाष किशनराव (इतर मागास प्रवर्ग) – ९ हजार ४३३ मते, पूनम वैâलास पाटील (महिला प्रवर्ग) – ८ हजार २ मते व दत्तात्रय सुंदरराव भांगे (भटके विमुक्त जाती-जमाती) प्रवर्ग – ७ हजार २२६ मते हे विजयी झाले. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव तथा निवडणुक निर्णय अधिकारी  डॉ.भगवान साखळे, निवडणुक समितीचे अयक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आले.

निवडणुक प्रवर्ग निहाय उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे :-
प्रवर्ग – अनुसूचित जाती (एसटी) – (वैध मते १४ ३२८)
१. मगरे सुनिल यादवराव – ८,९३६ – विजयी
२. बनसोडे निवृत्ती विश्वनाथ -१,२०१
३. दुर्गे जगन रुपचंद – ३८७
४. जोगदंड रोहित दिपक – ७१२
५. कांबळे शिरीष मिलिंदराव – ५३६
६. खाजेकर छाया राजु – २,०६५
७. तायडे राहुल भिमराव – ४९१

 प्रवर्ग – अनुसूचित जमाती (एसटी) – (वैध मते – १४,२२८)
१. निकम सुनिल पुंडलिकराव – ८,०५१ विजयी
२. बर्डे भागवत रामप्रसाद – १,६३०
३. माळी शहाजी विश्वनाथ – १,२१७
४. मोहम्मद अजारुद्दीन मोहम्मद सलीम – ३,३३०

 प्रवर्ग – वि.जा/भ.ज (व्हीजे एनटी) – (वैध मते – १३,४५१)
१. भांगे दत्तात्रय सुंदरराव – ७,२२६ – विजयी
२. आघाव विनोद संतोष – १,३९०
३. कांबळे रखमाजी भागुजी – १,३२९
४. फड चंद्रकांत शिवाजीराव – २,४८९
५. सलामपुरे पुनम केशव – १,०१७

प्रवर्ग – इतर मागास वर्ग उमेदवार (ओबीसी) – (वैध मते – १३,८४२)
१. राऊत सुभाष किसनराव – ९,४३३ – विजयी
२. जाधव संदीप दत्तात्रय – १,९५४
३. थोरात संतोष कारभारी – १,५३७
४. वाघ गणेश लक्ष्मण – ९१८

प्रवर्ग – महिला उमेदवार – (वैध मते – १३८८५)
१. पाटील पुनम वैâलास – ८,००२ – विजयी
२. गायकवाड नंदा लक्ष्मणराव – १,६९५
३. काळे हर्षेमाला नरेंद्र – १,२८०
४.तुपे ज्योती आसाराम – २,९०८

Back to top button
error: Content is protected !!