महाराष्ट्र

लातूर: तुझ्यासारखे लई पोलिसवाले बघितलेत, मी वन मन आर्मी ! रिक्षाचालकाने पोलिसाची गचांडी पकडून कानशीलात लगावली, अंगावर रिक्षा घालण्याचाही प्रयत्न !!

लातूर, दि. २८ – जादा प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षा चालकाला इशारा करूनही त्याने रिक्षा दामटली. वाहतूक पोलिसानेही त्याचा पाठलाग करून पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याची विचारपूस करण्यास सुरुवात केली असता तुझ्यासारखे लई पोलिसवाले बघितले. मी वन मन आर्मी असल्याचे रिक्षाचालकाने पोलिसाला सुनावले. त्यानंतर रिक्षाचालकाने पोलिसाची गचांडी पकडून कानशीलात लगावली. ही घटना लातूर शहरात घडली.

संभाजी अभिमान आदमाने (रा. काळे बोरगाव ता जि लातूर) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोअं भालचंद्र कबीरदास माने यांनी दिलेली माहिती अशी की,  दोन वर्षांपासून वाहतुक नियंत्रण कक्ष लातूर येथे पोलीस अमलदार म्हणून ते कार्यरत आहेत. दि.27/11/2022 रोजी सकाळी 12.00 ते दुपारी 15.00 वाजता व संध्याकाळी 18.00 21.30 वाजे पर्यंत पिव्हीआर चौक लातूर येथे कर्तव्यास होते.

पोअं भालचंद्र कबीरदास माने हे 18.00 ते 21.00 वाजे दरम्यान पिव्हीआर चौक लातूर येथे कर्तव्य बजावत असताना 19.45वाजेच्या सुमारास एक ऑटो (क्र. MH- 24 AT 0437) हा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत असताना पोअं भालचंद्र कबीरदास माने यांच्या निदर्शनास आले. त्यास थांबण्याच्या इशारा केला असता ऑटो चालकाने पोअं भालचंद्र कबीरदास माने यांच्या अंगावर घालून धडक देण्याच्या बेतात असताना पोअं भालचंद्र कबीरदास माने  पाठीमागे सरकले.

त्यानंतर त्याने रिक्षा पुढे दामटली. पोअं भालचंद्र कबीरदास माने यांनीही त्यांच्या मोटारसायकलने ऑटोचा पाठलाग केला. त्यास भारत मंडप डेकोरेशन अन्ड मंगल सेवा दुकाना समोर बार्शी रोड लातूर येथे गाठले. त्यास रोडच्या कडेला थांबवले. क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवासी असल्याने खटला भरण्याचे पोअं भालचंद्र कबीरदास माने यांनी त्यास सांगितले. यावर रिक्षा चालकाने तू कोण माझी गाडी थांबवणारा आहेस तुझ्यासारखे लई पोलीसवाले बघितलेत म्हणाला.

तेंव्हा त्यास पोअं भालचंद्र कबीरदास माने यांनी ऑटोच्या खाली उतरण्याच्या सूचना केला. त्याने पोअं भालचंद्र कबीरदास माने यांना शिवीगाळ केली व ऑटोच्या खाली उतरुन तू काय करणार आहेस मी वन मन आर्मी आहे असे म्हणून पोअं भालचंद्र कबीरदास माने यांची गचांडी धरली. पोअं भालचंद्र कबीरदास माने यांच्या कानावर व गालावर चापटाने मारले. या दरम्यान ऑटोमधील जास्तीचे प्रवासी भीतीपोटी निघुन गेले व ऑटोत बसलेल्या प्रवासी पैकी एक प्रवासी समक्ष हजर होता. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने संभाजी अभिमान आदमाने (रा. काळे बोरगाव ता जि लातूर) असे सांगितले.

ऑटो चालक यास त्याचे नाव विचारले असता त्याने घटनास्थळावर नाव सांगण्यास नकार दिला. त्यामुळे पोअं भालचंद्र कबीरदास माने यांनी त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन एमआयडीसी लातूर येथे आणले. पोलीस स्टेशन एमआयडीसीलातुर येथे त्याने त्याचे नाव मुरलीधर रोकोबा गायकवाड (46 वर्षे व्यवसाय ऑटो चालक रा. अंजली नगर लातूर) असे सांगितले. याप्रकरणी पोअं भालचंद्र कबीरदास माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून संभाजी अभिमान आदमाने यांच्यावर एमआईडीसी लातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!