महाराष्ट्र
Trending

विद्युत सहाय्यकांची कागदपत्रे पडताळणीस एक दिवसाची मुदतवाढ !

३१ ऑक्टोबर २०२२ रोजीही होणार पडताळणी

Story Highlights
  • जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता याउपरही हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल, असे महावितरणने कळवले आहे.

औरंगाबाद, दि. 31 : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रसिद्ध केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांची तसेच प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्र पडताळणीस एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता परिमंडलनिहाय ३१ ऑक्टोबर २०२२ रोजीही उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांची त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झालेली आहे. परंतु ज्या उमेदवारांना या दिवशी उपस्थित राहणे शक्य झाले नाही, त्यांना आणखी एक संधी महावितरणकडून देण्यात आली आहे.

उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता याउपरही हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल, असे महावितरणने कळवले आहे.

Back to top button
error: Content is protected !!