राष्ट्रीय
Trending

मंदिरात चोरी केल्याने चोरट्याचे झाले खूप नुकसान, साक्षात्कार झालेल्या चोरट्याने माफीनाम्यासह मंदिरातून चोरलेल्या मौल्यवान वस्तू केल्या परत !

Story Highlights
  • शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरातून चांदीचे नऊ छत्र यासह महागड्या धातूच्या दहा वस्तू आणि पितळीच्या तीन वस्तू चोरून नेल्या होत्या.

बालाघाट (म.प्र.), 30 ऑक्टोबर – मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील एका चोराने काही दिवसांपूर्वी मंदिरातून चोरलेल्या चांदीच्या आणि पितळी वस्तू माफी मागून परत केल्या आहेत.

या पत्रात चोराने लिहिले, ‘या चोरीमुळे माझे खूप नुकसान झाले आहे.’ बालाघाट जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय डाबर यांनी रविवारी ही माहिती दिली. 24 ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात चोरट्याने ठाणे लामटा येथील बाजार चौकात असलेल्या शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरातून चांदीचे नऊ छत्र यासह महागड्या धातूच्या दहा वस्तू आणि पितळीच्या तीन वस्तू चोरून नेल्या.

ते म्हणाले की, चोरीची घटना गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केला, त्यामध्ये परिसरात गस्त घालून आणि बारकाईने पुरावे गोळा करून, मागील चोरीतील आरोपी आणि संशयितांवर सातत्याने बारकाईल लक्ष ठेवण्यात येत होते.

डाबर यांनी सांगितले की, घाबरलेल्या आरोपींनी या मंदिरातून चोरलेले सर्व छत्र आदी माफीनाम्यासह ग्रामपंचायतीच्या नळावर एका पिशवीत ठेवल्या होत्या, ही बाब शुक्रवारी पाणी भरण्यासाठी गेलेल्या जैन कुटुंबीयांच्या लक्षात आली आणि त्यांनी याबाबतची माहिती दिली. जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस खात्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!