महाराष्ट्र
Trending

महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाटयस्पर्धेत नांदेडचे “नजरकैद” प्रथम ! नाट्य निर्मीतीसह सात बक्षीसांची लयलूट !!

नांदेड, दि.१८ ऑक्टोबर : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालया अंतर्गत लातूर येथे पार पडलेल्या आंतरपरिमंडलीय नाटयस्पर्धेत नांदेड परिमंडळाच्या नाटय संघाने सादर केलेल्या नजरकैद या नाटकाने बाजी मारत सर्वोत्तोम नाटकाच्या पुरस्कारासह विविध वर्गवारीतील सात प्रथम व व्दीतीय पुरस्कारही पटकावले आहेत. तर लातूर परिमंडळाने सादर केलेल्या अबीर गुलाल या नाटकाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

लातूर येथे कृषी उत्तपन्न बाजार समितीच्या कै. दगडोजीराव देशमूख नाटयगृहात दि.१६ व १७ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या नाटय स्पर्धेत नांदेड परिमंडळासह लातूर व और्रगाबाद परिमंडळाची नाटके सादर झाली. या स्पर्धेत नांदेड परिमंडळाचे मुख्य अभिंयंता दत्तात्रय पडळकर यांच्या मार्गदर्शनाखली सादर करण्यात आलेल्या अभिजीत वाईकर लिखीत “नजर कैद” नाटकाने तीन नटकाच्या स्पर्धेत बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता भूजंग खंदारे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करून सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी नाटयपरिक्षक बाळकृष्ण धायगुडे, प्राचार्या डॉ. मीरा शेंडगे, सुनिल गुरव, अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके, पाटील, उपमहाव्यवस्थापक प्रविण बागूल, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री विश्वास पाटील प्रामूख्याने उपस्थित होते.

लटपटे यांनी विजेत्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देताना म्हणाले की, महावितरणच्या नाटयस्पर्धा या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना नवी ऊर्जा देणाऱ्या असतात. अंत्यंत निकोप वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे निश्चीतच प्रत्येक कलावंताच्या मनामधे सहकार्याची भावना निर्माण होईल असा विश्वासही व्यक्त केला.

नजर कैद या नाटकाची निर्मीती मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केली होती तर दिग्दर्शन प्रमोद देशमूख यांनी केले होते. प्रकाश योजना सुशिल पावसकर. नेपथ्य सुधाकर जाधव, सुनील वनमोरे यांनी तर रंगभूषा सुदर्शन कालेवाड, पंडित अंबेकर तसेच पार्श्वसंगीत शैलेंद्र पाटील आणि व्यवस्थापक म्हणून महेंद्र बागूल व धनंजय पवार यांनी काम पाहिले होते.

या स्पर्धेत नांदेड परिमंडळाने सर्वोत्तम नाटक : प्रथम – यासह दिगदर्शक – व्दितीय – प्रमोद देशमूख, अभिनय (पुरूष) – प्रथम – प्रमोद देशमूख, उत्तेजनार्थ अभिनय- राजकुमार सिंदगीकर, अभिनय (स्त्री) व्दितीय– पुर्वा देशमूख, नेपथ्य व्दितीय- सुधाकर जाधव, सुनील वनमोरे तर प्रकाश योजना व्दितीय- सुशील पावसकर अशाप्रकारे बक्षीसे पटकावली. या यशाबद्दल मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Back to top button
error: Content is protected !!