जालना येथे 19 ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, नागेवाडीत आयोजन
• सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रोजगार मेळावा
• इच्छुक उमेदवारांनी सोबत आवश्यक कागदपत्रे आणावेत
जालना, दि. 18 – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 रोजी मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, नागेवाडी, जालना येथे सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यासाठी विविध पदांची 710 रिक्तपदे उपलब्ध झाली आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे.
रोजगार कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते उपस्थित राहुन व प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करणार आहेत.
या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नोकरी ईच्छूक उमेदवारांनी लाभ घ्यावा. उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, इ. कंपनींना देण्यासाठी सोबत ठेवावे.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास WWW.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा यापुर्वी महास्वयंम वेबपोर्टलवर नोदणी केली असल्यास वरील रिक्तपदे व पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या पदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करुन लॉगीन करावे आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी रोजगार मेळावा ठिकाणी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे.
भरती इच्छुक नियोक्ते व उद्योजकांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपल्या लॉग-इनद्वारे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, जालना यामध्ये भरण्यात यावी. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02482-299033 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि नोकरी ईच्छूक उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन श्री. चाटे यांनी केले आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट