महाराष्ट्र
Trending

औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, एअर ॲम्ब्युलन्सने राजधानीला हलवले !

औरंगाबाद, दि. 18 – औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी रात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. येथीलच प्रसिद्ध सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर त्यांना अधिकच्या उपचारासाठी राजधानी मुंबईला तातडीने हलवले आहे. एअर ॲम्ब्युलन्सने त्यांना मुंबईमध्ये दाखल करण्यात आले आहे.

राज्यात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यात शिंदे गटाकडून आमदार शिरसाट यांनी महत्त्वाची भूमीका निभावली होती. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे नाव नसल्याने शिरसाट यांच्या समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. मात्र, पत्रकार परिषद घेऊन शिरसाट यांनी नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास आमदार शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबाद शहरातील सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने पुढील उपचारासाठी आमदारा शिरसाट यांना आज मंगळवारी सकाळी राज्याची राजधानी मुंबईकडे हलवण्यात आले आहे.

माजी मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात संजय शिरसाट सहभागी होते. औरंगाबाद पश्चिममधून शिरसाट निवडून आलेले आहेत. तीन वेळा म्हणजेच विजयाची हॅट्ट्रिक त्यांनी साधलेली आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!