महाराष्ट्र
Trending

नांदेड हादरले: मुलीला हॉटेलात घेऊन गेल्याने मुलाचा खून करून स्मशानभूमीजवळ फेकून दिले !

Story Highlights
  • दरम्यान, नांदेड शहरात 24 तासांच्या कालावधीत दोन खून झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नांदेड, दि. 22 – पोरीला घेवून हॉटेलमध्ये जातो का म्हणून रॉडने मारहाण करीत मुलाचा खून केरून त्याला स्मशानभूमी परिसरात फेकून दिल्याची घटना लिंगायत स्मशानभूमी देगाव चाळ उर्वशी मंदिराजवळ रोडवर घडली.

स्वप्नील नागेश्वर असे मृत मुलाचे नाव आहे. यासंदर्भात शेषेराव बाबाराव नागेश्वर (वय 53 वर्षे, व्यवसाय- अँटोचालक रा. बसंतानगर, नांदेड) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, मूलगा स्वप्नील नागेश्वर हा उज्जवल गॅस एजन्सी मध्ये गॅस डिलीव्हरीचे काम करतो.

काल दिनांक 21/11/2022 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शेषेराव बाबाराव नागेश्वर घरी असताना एका अनोळखी मोबाईलवरून फोन आला व सांगितले की, मूलगा स्वप्नील हा लिंगायत स्मशानभूमी देगाव चाळ उर्वशी मंदिराजवळ रोडवर पडलेला आहे. तूम्ही लवकर या असे सांगितल्याने शेषेराव बाबाराव नागेश्वर व त्यांची पत्नी रेखाबाई नागेश्वर स्वताच्या अँटोने लिंगायत स्मशानभूमीजवळ पोहोचले.

ते रस्त्याने असतानाच त्यांचे जावाई गंगाधर गूडमलवार यांना फोनव्दारे माहिती देवून तेथे बोलावून घेतले. ते लिंगायत स्मशानभूमी जवळ गेले असता तेथे रोडवर मुलगा पडलेला होता त्याच्या नाकातून, कमरेपासून रक्तस्राव होत होता. तसेच त्याच्या शरीरावर गुडघ्यावर व अन्य भागावर मूक्का मार लागला होता.

त्याची जिभ काळी पडली होती. काय झाले ? तूला कोणी मारले ? असे विचारले असता त्याने सांगितले की, ‘गल्लीतील एका मुली सोबत नमस्कार चौकातील हॉटेलमध्ये गेलो असता तेथून स्वप्नीलला व त्याच्या सोबतच्या मुलीला आठ ते दहा अनोळखी पोरांनी जबरदस्ती ॲटोमध्ये बसवले.

स्वप्नीलला व मुलीला लाथाबूक्यानी मारत लिंगायत स्मशानभूमी कडे घेवून आले. पोरीला घेवून हॉटेलमध्ये जातो का म्हणून लाथाबुक्यानी, लाठीने, काठीने, रॉडने, हाता पायावर व कमरेवर गळ्यावर मारल्याचे स्वप्नीलने त्याच्या पित्याला सांगितले. जखमी स्वप्नीलला त्याच्या आई-वडीलांनी लगेच सरकारी दवाखाना विष्णूपूरी नांदेड येथे त्यांच्याच ॲटोने घेवून गेले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

शेषेराव बाबाराव नागेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दहा अनोळखींवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!