महाराष्ट्र
Trending

बनेवाडीतील 114 अनधिकृत नळ कनेक्शन तोडले ! औरंगाबाद महानगरपालिकेच्या मोहीमेने अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांच्या तोंडचे पाणी पळाले !!

औरंगाबाद, दि.२२ नोव्हेंबर – औरंगाबाद महानगर पालिकेने अनाधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. बनेवाडी येथे ११४ अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. या कारवाईमुळे अनाधिकृत नळ कनेक्शन धारकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

महानगरपालिका हद्दीतील विविध ठिकाणी अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी विशेष पथकांची नेमणूक केली आहे.

आज दि. २२/११/२०२२ रोजी म.न.पा अनधिकृत नळ जोडणी शोध मोहीम पथक क्रमांक ०१  चे पथक प्रमुख तथा  मुख्य लेखाधिकारी  संतोष वाहुळे  यांच्या अधिपत्याखाली  बनेवाडी येथील मनपा च्या १५०  मिमी मुख्य  जलवाहिनी वरील एकूण ११४  अनधिकृत नळ जोडणी खंडित करण्यात आल्या.

या कारवाई प्रसंगी उप अभियंता मिलिंद भामरे, रोहित इंगळे पथक अभियंता, कनिष्ठ अभियंता एन. वी. वीर, सचिन वेलदोडे, किरण तमनार, संतोष खेडकर, लक्ष्मण शेजुळ, शेख सिराज, नागरी मित्र पथक कर्मचारी  व पथक कर्मचारी मो. शरीफ, तमिज पठाण, वैभव भटकर, स्वप्नील पाईकडे, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार, उमेश दाने यांची उपस्थिती असल्याची माहिती पथक क्र १ चे पथक अभियंता रोहित इंगळे यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!