महाराष्ट्र
Trending

नांदेडमध्ये वलिमाच्या कार्यक्रमात खंजर खुपसून मर्डर ! दुचाकी व बुलेटवर आलेल्या टपोरींना साऊंड सिस्टिमवर नाचण्यास मनाई केल्याने राडा !!

'हम ने पहले भी मर्डर कर चुके है, हमारा पुलीस कुछ नही कर सकती'

नांदेड, दि. 22 – नांदेडमध्ये वलिमाच्या कार्यक्रमात खंजर खूपसून मर्डर केल्याची खळबळजनक घटना घडली. दुचाकी व बुलेटवर आलेल्या टपोरींना साऊंड सिस्टिमवर नाचण्यास मनाई केल्याने त्यांनी राडा घातला. यात एकाचा बळी गेला. घटना घडताच टपोरींनी गाड्या तेथेच सोडून पळ काढला.

शेख मोईस असे मृताचे नाव आहे. यासंदर्भात शेख इक्बाल शेख जैनोद्दीन (वय 55 वर्षे, व्यवसाय ऑटो चालक रा. कर्मवीर नगर, बौद्ध विहार समोर नांदेड) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दि. 21/11/2022 रोजी मोठा मुलगा शेख नदीम शेख इक्बाल (वय 24 वर्षे) याच्या लग्नानिमित्त वस्तीमध्ये घराच्या समोरील रोडवर वलिमा कार्यक्रम निमित्त कनात लावली होती.

वस्ती मधील शेजारी आणि नातेवाईक वलीमा करिता आले होते. रात्री 09:00 वाजे दरम्यान कार्यक्रम मध्ये जेवण सुरु होते. त्यामुळे वलिमामध्ये लावलेला डेक (साऊंड सिस्टिम) बंद केला होता. तेव्हा दोन बुलेट आणि एका मोटार सायकल वर फारुख नगर नांदेड येथील सातजण आले. त्यांनी वलिमा कार्यक्रम मध्ये आम्हाला डेक लावून नाचायचे आहे असे म्हटले. तेव्हा मुलगा शेख मोईसने डेक लावण्यास व नाचण्यास नकार दिला.

यामुळे शेख मोईसला बुलेट व मोटार सायकलवर आलेल्या सोहेल खान नवीद खान (वय 29 वर्षे), आमु उर्फ आमेर शेख पाशा (वय  23 वर्षे), मोहम्मद जाकेर (24 वर्षे), मोहम्मद इस्माईल चोली (23), मोहम्मद कैफ (21), आसिफ  (26) व सय्यद सादिक (22) यांनी धारदार खंजर व रॉड काढले. त्यातील मोहम्मद चोली ‘हम ने पहले भी मर्डर कर चुके है, हमारा पुलीस कुछ नही कर सकती’ असे म्हणून मुलगा शेख मोईस याला मारहाण केली.

तेव्हा शेख यांचा दुसरा मुलगा शेख मोईन वाचवण्यास आला असता सर्वांनी शेख मोईन यास पकडून बाजूच्या गल्ली मध्ये घेवून गेले. मो. चोलीने शेख मोईन याच्या छातीत खंजर खुपसला. इतर जणांनी रॉड ने शेख मोईनवर वार केले. त्यात शेख मोईन जखमी होऊन खाली कोसळला.

तेव्हा शेख मोईस व शेख नदीम व शेख मुन्ना शेख अजीज त्याला सोडवायला गेले असता सोहेल खान, आमेर पाशा, मोहमद जाकेर, इस्माईल चोली, शेख कैफ व आसीफ यांनी धक्काबुक्की करून मारहाण केली. पळून जात असताना नातेवाईकांनी पकडून मारहाण केली.

त्यात तीन चार जण जखमी झाले आणि आपल्या बुलेट व मोटार सायकल तिथेच सोडून पळून गेले. शेख मोईन हा जखमी असल्याने रशीद बी, शेख सिद्दिक मो. फकीर यांनी हॉस्पिटल मध्ये उपचार साठी घेवून गेले. डॉक्टरांनी शेख मोईनला तपासून मृत घोषित केले. शेख इक्बाल शेख जैनोद्दीन यांच्या तक्रारीवरून सात जणांवर विमानतळ (नांदेड) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!