महाराष्ट्र
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: निवडणुकीसाठी 465 अध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण !

विद्यापीठ प्रशासन सज्ज

Story Highlights
  • विद्यापीठाच्या नाटयगृहात आयोजित या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते सोमवारी (दि.२१) करण्यात आले.
  • अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळाची ही संपूर्ण निवडणुक प्रक्रिया पारदर्शक, गतीमान पध्दतीने राबविण्यात येत आहे.

औरंगाबाद, दि.२१: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १० जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज झाले असून ४६५ अध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांना सोमवारी (दि.२१) प्रशिक्षण देण्यात आले.

विद्यापीठाच्या नाटयगृहात आयोजित या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते सोमवारी (दि.२१) करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, निवडणुक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे, उपकुलसचिव डॉ.विष्णु क-हाळे, मास्टर ट्रेनर डॉ.मुस्तजिब खान, कक्षाधिकारी अर्जुन खांड्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निवडणुकी संदर्भात कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी मार्गदर्शन केले. तर पसंतीक्रमाची निवडणुक कशा पध्दतीने घ्यावी, निवडणुक प्रक्रिया या बद्दलची सविस्तर माहिती डॉ.मुस्तजिब खान यांनी दिली. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केले.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक : कुलगुरु
यंदाची अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळाची ही संपूर्ण निवडणुक प्रक्रिया पारदर्शक, गतीमान पध्दतीने राबविण्यात येत आहे. निवडणुक प्रक्रियेत सहभागी सर्वांनी ही प्रक्रिया अत्यंत शिस्तबध्दरितीने राबवावी, असे आवाहन यावेळी कुलगुुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले. यावेळी डॉ.विष्णु क-हाळे यांनी सूत्रसंचालन तर संजय लांब यांनी आभर मानले.

छाननी प्रक्रिया पूर्ण
अधिसभेच्या दुस-या टप्प्यातील निवडणुकीसाठी दाखल अर्जातून २६६ अर्जांची छाणनी रविवारी करण्यात आली. अधिसभा, विद्या परिषद व विविध अभ्यास मंडळासाठी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातील निवडूणक होत असून दुस-या टप्प्यात अधिसभेच्या २९ जागांसाठी उर्वरित गटातून १० डिसेबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. २९ जागांसाठी निवडणूक होत असून यामध्ये प्राचार्य व महाविद्यालयीन प्राध्यापक गटातून प्रत्येकी दहा जागांसाठी तर संस्थाचालक गटातून सहा व विद्यापीठ शिक्षकातून ३ जागासाठी तसेच विद्या परिषदेच्या आठ जागांसाठी मतदान होणार आहे.

१९ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. तोपर्यंत महाविद्यालयीन शिक्षक ११८ , संस्थाचालक २७, प्राचार्य २९, विद्यापीठ शिक्षक १४ याप्रमाणे १८८ अर्ज दाखल झाले तर विद्या परिषदेसाठ एकूण ४७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या शिवाय विविध अभ्यास मंडळांसाठी २२३ अर्ज दाखल झाले. या सर्व जागांसाठी एकुण ४४९ अर्ज दाखले झाले आहेत . या अर्जांची रविवार व सोमवार अशी दोन दिवस छाणनी झाली.

पहिल्या दिवशी विद्यापीठ, शिक्षक प्राचार्य व विभाग प्रमुख अशी २६६ अर्जांची छाणनी झाली. तर सोमवारी महाविद्यालयीन प्राध्यापक (अधिसभा व विद्या परिषद) तसेच संस्थाचालक गटात दाखल १९२ अर्जांची छाणनी झाली. वैध- अवैध उमेदवारांची यादी मंगळवारी घोषित होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी या संदर्भात अपीले दाखल करता येतील तर २४ नोव्हेंबर रोजी मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले हे अपिलांवर सुनावनी घेणार आहेत. अर्ज मागे घेण्याचा दिवस २७ नोव्हेंबर सकाळी १० ते ५ असून याच दिवशी अंतिम यादी प्रकाशित होईल. १० डिसेंबर रोजी मतदान तर १३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

निवडणुकीसाठी समिती स्थापन
पदवीधर मतदारसंघाची निवडणुक व मतमोजणसाठी ७ सदस्यांची समिती .कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी स्थापन केली आहे. या समितीत डॉ.एस.एन.दाते, डॉ.पी.बी.पापडीवाल, डॉ.अनिता मुरुगकर, डॉ.सचिन देशमुख, डॉ.मुस्तजिब खान, डॉ.प्रवीण यन्नावार, डॉ.कीर्तिवंत घडेले यांचा समावेश आहे. पदवीधर गटातून ३६ हजार ८०२ मतदारांनी नोंदणी केली असून ४ जिल्हयातील ८१ केंद्रावर येत्या शनिवारी (दि.२६) मतदान होणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!