महाराष्ट्र
Trending

पुणे: म्हशीच्या बछड्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक !

पुणे, २९ ऑक्टोबर – महाराष्ट्रातील पुणे शहरात एका म्हशीच्या बछड्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.

ही घटना शुक्रवारी शहरातील डेक्कन भागात घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. स्थानिकांनी त्या व्यक्तीला म्हशीच्या बछड्यासोबत अनैसर्गिक कृत्य करताना पाहिले. त्यानंतर त्यांनी त्याला मारहाण केली. यात तो व्यक्ती बेशुद्ध पडला.

ते म्हणाले की, आरोपी नेपाळचा आहे, त्याला ससून जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक म्हणाले, “स्थानिक लोकांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे, त्या व्यक्तीविरुद्ध कलम 377 आणि भारतीय दंड संहिता आणि प्राण्यांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

Back to top button
error: Content is protected !!