महाराष्ट्र
Trending

कन्नड: औराळा उपकेंद्रातील विद्युत सहाय्यक लाच घेताना पकडला ! मीटरसाठी घेतले ५ हजार !!

औरंगाबाद, दि. २८ – शेतात वीज पंपासाठी नवीन इलेक्ट्रिक मीटर व जोडणी देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना विद्युत सहाय्यकास रंगेहात पकडण्यात आले. यापूर्वी तीन व आज दोन असे एकूण ५ हजार रुपये त्याने घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. कन्नड तालुक्यातील औरळा उपकेंद्रातंर्गत ही कारवाई करण्यात आली.

ऋषिकेश गंगाधर वाडेकर (वय २२ वर्षे , पद विद्युत सहाय्यक वर्ग 4, उपकेंद्र औराळा, तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद)

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांच्या शेतात वीज पंपासाठी नवीन इलेक्ट्रिक मीटर व जोडणी बसवून देण्यासाठी विद्युत सहाय्यक ऋषिकेश गंगाधर वाडेकर यांनी पाच हजार रुपये (रुपये 5000/-) लाचेची मागणी केली. त्यातील 3000 रुपये तक्रारदाराकडून ऋषिकेश गंगाधर वाडेकर यांनी पूर्वी स्वीकारले व दोन हजार रुपयांची आज रोजी मागणी करून पंचा समक्ष स्वीकारले.

ही कारवाई संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद,  विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक,  मारूती पंडित, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली  सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक दिलीप साबळे, सापळा पथक पोलीस अंमलदार भीमराव जिवडे विलास चव्हाण, पोलीस हवालदार थोरात चालक पोलीस अंमलदार सोनवणे यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!