राष्ट्रीय

केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती !

डेहराडून, 18 ऑक्टोबर – गुप्तकाशीहून केदारनाथला यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर मंगळवारी गरुड चट्टीजवळ कोसळले. सूत्रांनी ही माहिती दिली.

या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शोध आणि बचाव कार्यासाठी एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!