महाराष्ट्र
Trending

जांबसमर्थचे देव सापडले: बीड, औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूरसह 11 जिल्हे पिंजून काढूत चोरट्यांना बेड्या ठोकल्या !

जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Story Highlights
  • महादेव शिवराम चौधरी (ओतारी) रा. संजय नगर वैराग ता. बार्शी जि. सोलापूर यास ताब्यात घेवून श्रीराम-सीता माता, भरत, शत्रुघ्न, दोन हनुमान अशा एकूण 05 मूर्ती हस्तगत करण्यात आलेल्या आहेत व उर्वरीत मूर्ती या फरार आरोपी घेवून गेल्याचे सांगितले.

जालना, दि. 28 – गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या जांबसमर्थ येथील देवी-देवतांच्या मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला. महाराष्ट्रातील बीड, औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, मुंबई, बुलढाणा जिल्हा पिंजून काढत पोलिसांनी सोलापूर आणि कर्नाटक राज्यामधून दोघांना अटक करण्यात आली असून फरार एकाचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातून भगवान श्रीराम, सीतामाता, भरत, शत्रुघ्न, दोन हनुमान अशा एकूण 05 मूर्ती हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ अक्षय शिंदे यांनी आज, 28 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.

शेख राजु शेख हुसेन (रा. कर्नाटक राज्य, ह.मु सांजा नगर रामनगर उस्मानाबाद), महादेव शिवराम चौधरी (ओतारी) (रा. संजय नगर वैराग ता. बार्शी जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 22/08/2022 रोजी तक्रारदार धनंजय वसंतराव देशपांडे (रा. जांबसमर्थ ता. घनसावंगी जि. जालना) यांनी पोलीस ठाणे घनसावंगी येथे येवून तक्रार दिली की, जांबसमर्थ येथील राममंदिर येथे ते पुजारी व व्यवस्थापक म्हणून काम करतात. दिनांक 21/08/2022 रोजी रात्री 21.00 ते दिनांक 22/08/2022 रोजी 06.00 वा दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी राम मंदिरामध्ये प्रवेश करून गाभाऱ्यातील भगवान श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता व हनुमान तसेच इतर देवतांच्या मूर्ती चोरून नेल्या आहेत. या आशयाच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे घनसावंगी येथे गुन्हा दाखल असून गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक डॉ अक्षय शिंदे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्याकडे देण्यात आला.

गुन्हयाचे घटनास्थळास पोलीस अधिक्षक डॉ अक्षय शिंदे यांनी भेट देवून गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हा उघडकीस आणण्या करीता पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना सूचना दिल्या. त्यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकरी व अंमलदार यांचे वेगवेगळे तपास पथके तयार करण्यात आले होते.

सर्व तपास पथके हे गुन्हयाचा गुप्त बामतीदारा मार्फत, तात्रीक विश्लेषनाद्वारे रेकॉर्ड वरील आरोपीतांना चेक करून तसेच सर्व प्रकारे बारकाईने तपास करीत होते. तपासा दरम्यान पथकातील अधिकारी अंमलदार हे संपूर्ण महाराष्ट्रातील बीड, औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, मुंबई, बुलढाणा तसेच कर्नाटक राज्यामध्ये जावून गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न केले.

दरम्यान दिनांक 25/10/2022 ते दिनांक 28/10/2022 पर्यंत तीन दिवस पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग व स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील सर्व अधिकारी अमंलदार तपासकामी उस्मानाबाद, सोलापूर, लातूर व कर्नाटक राज्यामध्ये जावून गुन्हयातील आरोपी व चोरीचा शोध घेत असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीवरून गुन्हयातील आरोपी शेख राजु शेख हुसेन (रा. कर्नाटक राज्य, ह.मु सांजा नगर रामनगर उस्मानाबाद) यास सोलापूर जिल्हयातून ताब्यात घेतले. विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या एका साथीदारासह केल्याचे सांगून चोरी केलेल्या मूर्ती महादेव शिवराम चौधरी (ओतारी) रा. संजय नगर वैराग ता. बार्शी जि. सोलापूर याचेकडे ठेवल्याचे सांगितले.

त्यावरुन त्याच्या साथीदाराचा उस्मानाबाद, सोलापूर लातूर, कर्नाटक राज्यामध्ये तपास पथका मार्फत शोध घेत आहोत. महादेव शिवराम चौधरी (ओतारी) रा. संजय नगर वैराग ता. बार्शी जि. सोलापूर यास ताब्यात घेवून श्रीराम-सीता माता, भरत, शत्रुघ्न, दोन हनुमान अशा एकूण 05 मूर्ती हस्तगत करण्यात आलेल्या आहेत व उर्वरीत मूर्ती या फरार आरोपी घेवून गेल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोउपनी प्रमोद बोंडले, सपोनि शशिकांत तवार, पोठपनि संदिप ओहोळ, (ने- उस्मानाबाद) अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, संजय मगरे, फुलचंद हजारे, भाऊराव गायके, विनोद गडदे, कृष्णा तंगे, रुस्तुम जैवाळ, जगदीश बावणे, रंजीत वैराळ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, देविदास भोजने, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे,

भागवत खरात, किशोर पुंगळे, योगेश सहाणे, धिरज भोसले, कैलास चेके, रवी जाधव मपोना / चंद्रकला शडमल्लु, गोदावरी सरोदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना तसेच विशेष तपास पथकातील संजय लोहकरे पोलीस निरीक्षक, औरंगाबाद (ग्रामीण) सपोनि योगेश धोंडे, पोउपनि सतोष मरळ, गणेश राऊत, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस ठाणे घनसावंगी व अंमलदार रामप्रसाद रंगे, रामेश्वर जाधव, अंबादास साबळे, लक्ष्मीकांत आडेप तसेच पथकातील ईतर अंमलदार यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!