महाराष्ट्र
Trending

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शासन निर्णयातील वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करा !

Story Highlights
  • शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी 10 ऑक्टोबर पासून आजाद मैदान येथे शिक्षक समन्वय संघातर्फे सुरू असलेले महाएल्गार बेमुदत धरणे आंदोलनाची दखल घेण्यात यावी

औरंगाबाद, दि. 28 –  शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी 10 ऑक्टोबर पासून आजाद मैदान येथे शिक्षक समन्वय संघातर्फे सुरू असलेले महाएल्गार बेमुदत धरणे आंदोलनाची दखल घेण्यात यावी, अशी मागणी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता  शेख अब्दुल रहीम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना थेट भेटून केली.

10 ऑक्टोबर 2022 पासून आजाद मैदान येथे शिक्षक समन्वय संघातर्फे शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू असलेले “महाएल्गार” बेमुदत धरणे आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर विचार करून योग्य निर्णय त्वरित घ्यावा अशी विनंती एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनी केली. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी सकाळीच भेट घेतली व चर्चा करून निवेदन सादर केले.

या आहेत मागण्या….

१) 19 सप्टेंबर 2016 चा शासन निर्णय रद्द करून विनाअनुदान तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 या शासन निर्णयातील वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करण्यात यावे.

२) अंशतः अनुदानित, विनाअनुदनित शाळेतील शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावे.

३) अनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचा पगार राष्ट्रीयकृत बँकेतूनच तसेच 1 तारखेलाच SBI CMP प्रणालीतूनच करण्यात यावा.

या प्रलंबित मागण्यांवर मुख्यमंत्री म्हणून तातडीने लक्ष घालावे व राज्यातील हजारो शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा हजारो शिक्षकांची आहे. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, आपला हा अनुदानाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे आश्वासनही त्यांनी  दिले. यावेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे जळगाव जिल्हा संघटक फैसल अहेमद खान तसेच सिल्लोडचे माजी तालुकाध्यक्ष शेख इलियास, शेख साबीर आदींची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!