महाराष्ट्र
Trending

जालना पोलिसांनी कर्नाटकातून आवळल्या जांब समर्थ मूर्ती चोरांच्या मुसक्या !

कर्नाटक राज्यातून मूर्ती चोरांना पकडले

जालना, दि. 28 – जांब समर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. अथक परिश्रमानंतर पोलिसांना या चोरी प्रकरणात उलगडा करण्यात यश आले आहे. कर्नाटक राज्यातून चोरट्यांना जालना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून मूर्तीही हस्तगत करण्यात आल्या आहेत.

पोलिस पथकाने चोराच्या मुसक्या परराज्यातून आवळल्या असून पथक जालन्याकडे निघाले आहे. जालन्यात हे पथक पोहोचल्यानंतर सविस्तर माहिती मिळू शकेल.

जांब समर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरण संपूर्ण राज्यभरात गाजले. चोरटे हाती लागत नसल्याने पोलिस जेरीस आले होत. याशिवाय ग्रामस्थ व भाविकांमधून संतापाची लाट उसळत होती. दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्यक्ष दूरध्वनीवरून पोलिसांना तपासाचे निर्देश दिले होते.

दोन महिने उलटूनही चोरटे हाती लागत नसल्याने पोलिसांनी अतिशय तांत्रिक बाबी आणि गुप्तहेरांच्या माध्यमातून या चोरी प्रकरणात छडा लावला. कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील चोरट्यांना पोलिसांनी गळाला लावले आहे.

Back to top button
error: Content is protected !!