महाराष्ट्र
Trending

महाराष्ट्रात भूकंप ! कोयना धरणाजवळ 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का !

Story Highlights
  • कोयना धरणाच्या भूकंपविज्ञान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोयना धरण परिसरात सकाळी ६.३४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

पुणे (महाराष्ट्र), 28 ऑक्टोबर – महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात शुक्रवारी सकाळी 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, असे त्यांनी सांगितले.

कोयना धरणाच्या भूकंपविज्ञान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोयना धरण परिसरात सकाळी ६.३४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना प्रदेशाच्या दक्षिण-पूर्वेला असलेल्या हेलवाक गावापासून पाच किलोमीटर अंतरावर होता, असे त्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!