महाराष्ट्र
Trending

हर्सूलमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून वापरत असलेली मारुती सियाझ कार पकडली !

औरंगाबाद, दि. २६ – बनावट रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून वापरत असलेली मारुती सियाझ कार गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आली. ही कारवाई औरंगाबाद – जळगाव रोडवरील हर्सूल कब्रस्ताजवळ करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दयानंद सुभाष दनके (वय 20 वर्ष, रा. साईनगर, गल्ली नं.01. पिसादेवी रोड, हर्सूल, औरंगाबाद), शेख नदीम शेख दाऊद (रा. जि.प. शाळेसमोर, धाड ता. जि. बुलढाणा ह.मु. देवळाई परिसर, औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. कार पकडली तेव्हा शेख नदीम हा हर्सूलच्या दिशेने निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 25/11/2022 रोजी गुन्हे शाखेस मिळालेल्या माहितीवरून जळगांव औरंगाबाद रोडने एक संशयास्पद मारुती सियाझ कार येत आहे. त्यावरुन हर्सूल कब्रस्तानजवळ मारुती सियाझ कार (क्र. MH-48-S-3083) ही संशयास्पद वाटल्याने थांबवली. त्याच वेळी सदर कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजुला बसलेला एक जण कारच्या खाली उतरून हर्सूल गावाच्या दिशेने निघून गेला.

कारमध्ये दयानंद सुभाष दनके (वय 20 वर्ष, रा. साईनगर, गल्ली नं.01. पिसादेवी रोड, हर्सूल, औरंगाबाद) हा मिळून आला. त्यास गाडीमधून उतरलेला व्यक्तीचे नाव काय आहे या बाबत विचारले असता त्याने त्याचे नाव शेख नदीम शेख दाऊद (रा. जि.प. शाळेसमोर, धाड ता. जि. बुलढाणा ह.मु. देवळाई परिसर, औरंगाबाद) असे असल्याचे सांगितले. ते कार मालक असून मी त्यांचेकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्यांच्या ताब्यातील मारुती सियाझ कारच्या मालकीहक्काचे कागदपत्रांची मागणी केली असता त्यांचेकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगितले.

सदर मारुती सियाझ कार वरील रजि. क्रमांकाची अभिलेखाशी पडताळणी केली असता सदरच्या क्रमांकावरून येणारा चेसीस क्रमांक व इंजीन क्रमांक व प्रत्यक्ष सदर मारुती सियाझ कारवरील चेसीस क्रमांक व इंजीन क्रमांक यामध्ये तफावत आहे. चेसीस व इंजीन क्रमांकावरुन MH-19-CU-5309 असा क्रमांक येत आहे. त्यामुळे गाडीवर बनावट क्रमांक टाकून वापर सुरु निष्पन्न झाले. त्यावरुन 7,25,000/- रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली असून दोघांवर पोलीस ठाणे हर्सूल औरंगाबाद शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त (मुख्या.) अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे  विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक गुन्हे शखा अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर एम जोंधळे व अंमलदार योगेश नवसारे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, कैलास काकड, रवि खरात व चालक रमेश गायकवाड (सर्व नेमणुक गुन्हे शाखा औरंगाबाद शहर) यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!