महाराष्ट्र
Trending

सिल्लोड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, पानवडोदला एकाच रात्री ८ घरे फडली !

औरंगाबाद, दि. २६ – घरांतील सदस्य बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी एकाच रात्री सिल्लोड तालुक्यातील पानवडोद खु. येथील ७ ते ८ घरे फोडली. एकूण 4,42,700/- रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्रीत चोरट्यांनी ७ ते ८ घरे फोडल्याने सिल्लोड तालुक्यात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलिसही अलर्ट झाले आहेत.

शामकांत दामोदर चौबे (वय 57 वर्षे, रा. पानवडोद खु., ता. सिल्लोड जि. औरंगाबाद), हेमंत प्रभाकर चौबे (वय 52 वर्षे), नागेश श्रीकृष्ण चोबे (75), निशीकांत चंद्रशेखर चोबे (52), अशोक गपणत गाडेकर (45), सचिन सुरेश चोबे (42),  त्र्यबंक चिंधाजी काळे (72), मीराबाई रामचंद्र काळे (सर्व रा. पानवडोद खु) या सर्वांच्या घराला चोरट्यांनी लक्ष केले. यातील काही जणांच्या घरात चोरी करण्यात चोरटे यशस्वी झाले तर काहींच्या घरातून त्यांना केवळ कुलूप तोडून चोरी न करता काढता पाय घ्यावा लागला.

यासंदर्भात शामकांत दामोदर चौबे (वय 57 वर्षे, रा. पानवडोद खु., ता. सिल्लोड जि. औरंगाबाद) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते व त्यांचा परिवार मागील आठ दिवसांपूर्वी जगन्नाथ पुरी येथे देव दर्शनासाठी गेले होते. दिनांक 24/11/2022 रोजी औरंगाबाद येथे परतले. दिनांक 25/11/2022 रोजी सकाळी 05.00 वाजेच्या सुमारास शामकांत दामोदर चौबे यांना शेजारी शाम रमेश दौड यांचा फोन आला.

त्यांनी सांगितले की तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे व कुलुप तुटलेले आहे. ही माहिती कळताच शामकांत दामोदर चौबे लगेच पत्नी व मुलासह पानवडोद येथे 09.00 वाजेच्या सुमारास घरी पोहोचले. घराचा पहिला व दुसरा दरवाजा उघडा होता व दोन्ही कुलूप कटरने तोडून बाजुला टाकलेले होते. घरातील कपडे व इतर सामान सर्वत्र अस्थाव्यस्थ पडलेले त्यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान, पोलीस पाटील नंदाबाई तात्याराव गांवडे यांनी ही सर्व माहिती पोलिसांना दिली. पोलिस काही वेळात डॉगस्काड, हाताचे ठसे घेणारे अधिकारी तातडीने निघाले. यामुळे शामकांत दामोदर चौबे हे घरा बाहेर थांबले. तेथे सुरु असलेल्या चर्चेतून समजले की शामकांत दामोदर चौबे यांच्या घरासह गावातील 1 ) हेमंत प्रभाकर चौबे (वय 52 वर्षे), 2) नागेश श्रीकृष्ण चोबे (75), 3) निशीकांत चंद्रशेखर चोबे (52),  अशोक गपणत गाडेकर (45), 5) सचिन सुरेश चोबे (42), 6 ) त्र्यबंक चिंधाजी काळे (72), 7) मीराबाई रामचंद्र काळे (सर्व रा. पानवडोद खु) यांच्या घरांचे कुलूप चोरट्याने तोडल्याचे समजले.

काही वेळात पोलीस आल्यानंतर त्यांनी पंचा समक्ष व डॉगस्काड, व हाताचे ठसे घेणारे अधिकारी व अजिंठा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी शामकांत दामोदर चौबे यांच्यासह स्थानिकांना विचारपूस केली. त्यानंतर घराची पाहणी केली. शामकांत दामोदर चौबे यांच्या घरातून एकूण 3,31,500 (तीन लाख एकतीस हजार पाचशे रूपये) किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. दिनांक 24/11/2022 चे 12.00 ते दिनांक 25/11/2022 चे 05.00 वाजे दरम्यान ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. घराला लावलेले कुलुप कटरच्या साह्याने तोडून तिजोरी, देवघर, कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले.

याशिवाय हेमंत प्रभाकर चौबे यांच्या घरीही चोरट्यांनी डाव साधला. दरवाजाचे कुलुप तोडुन घरा समोर लावलेल्या सीसीटिव्ही कॅमे-याचा डीव्हीआर 8000 रूपेय किंमतीचा लंपास केला.

नागेश श्रीकृष्ण चोबे यांचे राहते घर आठ दिवसांपासून बंद होते. घरामध्ये फक्त कापूस होता. घरातून एकबी वस्तू चोरीस गेली नाही. मात्र, त्यांच्या दरवाज्याचेही कुलूप कटरने तोडून चोरट्यांनी घरातील सामान अस्थाव्यस्थ केले.

निशीकांत चंद्रशेखर चौबे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एकूण 93,200/- रू किंमतीचा ऐवज चोरून नेला. अशोक गपणत गाडेकर हे रात्रीच्या वेळी घरात झोपलेले असताना घरासमोरील गेटला लावलेले कुलूप कटरच्या साह्याने तोडले परंतु घरामध्ये लोक असल्याची जाणीव झाल्याने चोरटे चोरी न करता पसार झाले.

सचिन सुरेश चोबे यांचे जुने घर गावात असून घरामध्ये शेतीचा माल कपाशी व इतर धान्य ठेवतात. त्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून खाली पडलेले होते. परंतु चोरट्यांना घरात काही मौल्यवान मिळून न आल्याने चोरीचा प्रयत्न फसला.

 त्र्यंबकराव चिंधाजी काळे हे वरच्या मजल्यावर राहतात त्याचे खालच्या घराचे कुंलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला.

मीराबाई रामचंद्र काळे या त्र्यंबक चिंधाजी काळे यांच्या घरात भाडेतत्वार राहताक. त्या दिनांक 24 /11 / 2022 रोजी त्यांच्या मुलीकडे गेलेल्या असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून नगदी रोख 10,000/- रू चोरून नेले.

दिनांक 24/11/2022 रोजी रात्री 11.30 ते दिनांक 25/11/2022 रोजी 05.00 वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने, भांडी तसेच रोख रक्कम असा एकूण 4,42,700/- रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!