महाराष्ट्र
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ’जनरल चॅम्पियनशिप’, राज्य क्रीडा महोत्सवाचा थाटात समारोप !

Story Highlights
  •  मुलांच्या संघाला चारही गटातील सुवर्णपदक
  •  २४ वर्षात पहिल्यांदाच यजमान संघाला ’जनरल चॅम्पियनशिप’
  •  मुलींच्या संघास कबड्डी, ’खो-खो’ मध्ये रौप्य पदक

औरंगाबाद, दि.७ : गेल्या पाच दिवसांपासून रंगलेल्या राज्य क्रीडा महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ बुधवारी जल्लोषात झाला. यजमान डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने मुलांच्या गटात चारही सुवर्णपदक जिंकून ’जनरल चँम्पियनशिप’वर नाव कोरले. मुलींच्या संघानेही कबड्डी, खो-खो स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर बुधवारी (दि.सात) दुपारी समारोप सोहळा झाला. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी ऑलंपिकपटू सुमंगला शर्मा, क्रीडा राजदूत तथा बास्केटबॉलपटू नवेली देशमुख यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

तर प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, राजभवन समितीचे अध्यक्ष डॉ.दीपक. माने, सदस्य डॉ.दिनेश पाटील, डॉ.मोहन अमरुळे, निकाल समितीचे शरद बनसोड, विठ्ठलसिंह परिहार, क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, संयोजन समिती सदस्य डॉ.उदय डोंगरे यांची मंचावर उपस्थिती होती. शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ.कल्पना झरीकर, संयोजन समिती सदस्य डॉ.फुलचंद्र सलामपुरे यांच्यासह सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते. प्रारंभी अत्यंत मनमोहक योगासण करुन क्रीडा रसिकांची मने जिंकली.

 तंत्राला द्या प्रयत्नांची जोड : सुमंगला शर्मा
कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल तर अधुनिक तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे जे ही करताय त्याला अखंड प्रयत्नांची जोड द्या, असा संदेश ऑलंपिकपटू सुमंगला शर्मा यांनी दिला.

 गोल सेट करा : नवेली देशमुख
कोणत्याही क्षेत्रात नावलौकिक मिळवायाचा असेल तर आपल्यातील ऊर्जा योग्य दिशेने नेली पाहिजे. गोल सेट करुन यशाचे शिखर गाठा, असे आवाहन क्रीडा राजदूत नवेली देशमुख यांनी केले. तरुणांचा देश म्हणून भारताची जगभर ओळख असून स्वतःसोबतच देशाचा नावलौकिक वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले.

 पुढील सर्व स्पर्धा मॅट, ट्रॅकवर : कुलगुरु
यापुढील काळात होणा-या सर्व प्रकारच्या मैदानी क्रीडा स्पर्धा या मॅटवर तर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा सिंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येतील, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घोषित केले. या महोत्सवात तांत्रिक बाबी व निकालात संपूर्ण पारदर्शकता होती. स्पर्धेतील चषक कदाचित जुनी होतील मात्र आठवणी नेहमीच ताज्या तसेच प्रेरणा देत राहतील, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. प्रारंभी डॉ.उदय डोंगरे यांनी महोत्सवाचा आढावा, अहवाल वाचन केले. डॉ.संदीप जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ.पुरुषोत्तम देशमुख व अमृत बि-हाडे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.दयानंद कांबळे यांनी आभार मानले.

 महोत्सवात एकुण ३७२ सांघिक सामने :
या क्रीडा महोत्सवात चार मुख्य क्रीडा प्रकारात पुरुष व महिला गटात एकूण ३७२ सामने खेळले गेले. यामध्ये साखळी बाद फेरी, उपांत्य व अंतिम सामन्यांचा समावेश आहे. व्हॉलीबॉल स्पर्धेत एकूण ९८ सामने झाले. तर बास्केटबॉल व कबड्डी प्रत्येकी ९३ तसेच खो-खो मध्ये एकूण ८८ सामने खेळले गेले. तर अ‍ॅथलेटिक्स गटात एकूण १४ प्रकारच्या स्पर्धा खेळाल्या खेळल्या गेल्या, अशी माहिती संयोजन समितीचे डॉ.उदय डोंगरे यांनी प्रास्ताविकात दिली. २२ विद्यापीठांचे २ हजार ३८९ खेळाडू, ३४५ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक सहभागी झाले. तसेच राज्यातून १४० तज्ज्ञ पंच सहभागी झाले, अशी माहिती डॉ.डोंगरे यांनी दिली.

चौवीस वर्षात पहिल्यांदाच यजमान संघ चॅम्पियन
महाराष्ट्रात ’राजभवन’च्या वतीने २४ वर्षांपासून ’अश्वमेध’ राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धा घेण्यात तसेच आहेत. यंदा प्रथमच यजमान संघात अर्थातच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातने ’जनरल चॅम्पियनशिप’ जिंकली आहे. यजमान संघास २६० गुणांसी सर्व समान्य विजेतेपद जिंकले. या संघाने पुरुष गटातील व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, खो-खो व कबड्डी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले तर मुलींच्या संघाने खो-खो व कबड्डी गटातील रौप्यपदक जिंकले. सावित्रीबाई फुुुले विद्यापीठाने २२० गुणांसह दुसरे स्थान राखले. मुलांच्या संघाचे सर्वसाधारण विजेतेपद यजमान संघाने तर मुलींच्या गटातील २०० गुणासह विजेतेपद पुणे विद्यापीठाने १८० गुणांसह जिंकले.

Back to top button
error: Content is protected !!