महाराष्ट्र
Trending

तुळजापूर मंदिरातील पुजाऱ्याची जागा बोगस पिआर कार्ड करून बळकावण्याचा प्रयत्न, सहा जणांवर गुन्हा !

उस्मानाबाद, दि. ७- तुळजापूर मंदिरातील पुजाऱ्याची जागा बोगस पिआर कार्ड करून बळकावण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार तुळजापूर पोलिस ठाण्यात देण्यात आली असून त्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात तक्रारदार किरण सतिश अमृतराव  (वय 30 वर्षे व्यवसाय शेती व तुळजाभवानी मंदिर पुजारी, रा. मंकावती गल्ली तुळजापूर, जि. उस्मानाबाद) याने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, तुळजापुर शहरामध्ये मातंगी मंदीराजवळ भीमनगर तुळजापूर येथे तुळजापुर सिटी सर्व्हे नं 1955 मध्ये माझे चुलतभाऊ महेश मधुकर अमृतराव अजय मधुकर अमृतराव व 1956 मध्ये किरण सतिश अमृतराव व  चुलते उत्तम शंकरराव अमृतराव, बाळासाहेब शंकरराव अमृतराव अशी वडिलोपार्जित खुली जागा आहे. ही जागा यांच्या सर्वांच्या ताब्यात आहेत.

दि.01/03/2022 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पुजारी किरण सतिश अमृतराव सदर जागेमध्ये सफाई करीत असताना भगवान भीमराव टोले (रा. पावणारा गणपती मंदिराजवळ तुळजापूर), प्रकाश शत्रुघ्न कदम, विशाल गणपतराव कदम, दीपक युवराज कदम, अरविंद दत्तु कदम, पुष्पराज सुंदरराव कदम (सर्व रा. भीमनगर मातंगी मंदिराजवळ तुळजापूर) तेथे आले. ही जागा आमच्या नावे असून सदर जागेचे PR कार्ड व फेरफार आदी कागदपत्रे दाखवली.

त्यामुळे सदर कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी पुजारी किरण सतिश अमृतराव यांनी उप अधिक्षक भूमी अभिलेख तुळजापूर यांचे कार्यालय गाठले. दि. 05/04/2022 रोजी जावून चौकशी केली असता सदरचे PR कार्ड व फेरफार हे बोगस व बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदरचे PR कार्ड व फेरफार रद्द करण्यासंदर्भात पुजारी किरण सतिश अमृतराव यांनी तक्रारी अर्ज दाखल केला.

तक्रारी अर्जाच्या अनुषशंगाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख उस्मानाबाद यांनी सदर तक्रारी अर्जाची चौकशी करून योग्य तो निर्णय द्यावा असे आदेशित केले. त्यानुसार पुजारी किरण सतिश अमृतराव यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची उप अधिक्षक भूमी अभिलेख तुळजापूर यांनी शहानिशा करून दि. 31/10/2022 रोजी कसबे तुळजापुर येथील ही मिळकत पत्रिका उघडताना अनियमितता झालेली असल्याने सदर मिळकत पत्रिका रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय दिला.  दि.31/10/2022 रोजी तसे त्यांनी कळवले.

त्यानुसार पुजारी किरण सतिश अमृतराव यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून भगवान भीमराव टोले (रा. पावणारा गणपती मंदिराजवळ तुळजापूर), प्रकाश शत्रुघ्न कदम, विशाल गणपतराव कदम, दीपक युवराज कदम, अरविंद दत्तु कदम, पुष्पराज सुंदरराव कदम (सर्व रा. भीमनगर मातंगी मंदिराजवळ तुळजापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!