अमरावती-पुणे मार्गे वाशीम, हिंगोली, परभणी, परळी द्वी-साप्ताहिक विशेष गाडीच्या 44 फेऱ्या !
नांदेड, दि. ७ – मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून अमरावती-पुणे-अमरावती दरम्यान विशेष गाडीच्या 44 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे. वाशीम, हिंगोली, परभणी, परळी या मार्गे ही गाडी धावणार आहे.
1. गाडी क्रमांक 01439 पुणे – अमरावती द्वी-साप्ताहिक विशेष गाडी (शुक्रवार आणि रविवार) :
ही गाडी पुणे येथून दिनांक 16 डिसेंबर, 2022 ते 26 फेब्रुवारी,2023 दरम्यान दर शुक्रवारी आणि रविवारी रात्री 22.50 वाजता सुटेल आणि दौंड, लातूर, परळी, परभणी, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे अमरावती येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 17.30 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 01440 अमरावती- पुणे द्वी-साप्ताहिक विशेष गाडी (शनिवार आणि सोमवार):
ही गाडी अमरावती येथून दिनांक 17 डिसेंबर, 2022 ते 27 फेब्रुवारी,2023 दरम्यान दर शनिवारी आणि सोमवारी रात्री 19.50 वाजता सुटेल आणि अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा, परभणी, परळी, लातूर, दौंड मार्गे पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 16.20 वाजता पोहोचेल.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट