महाराष्ट्र
Trending

मराठवाडा दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला !

मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याच्या प्रकल्पाला जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईदि. 24 : राज्यातील मराठवाडाविदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला असून, त्यासाठी जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करावेअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

 जागतिक बॅंकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शिष्टमंडळात शबनम सिन्हाआदर्श कुमारसुदीप मोजुमदारझियांग वाँग सदस्यांसमवेत निवृत्त सनदी अधिकारी प्रविण परदेशीजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरकौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्माबेस्टचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रामदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ताकृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग आदी यावेळी उपस्थित होते.

 आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्पहवामान बदल आणि त्यामुळे कृषी क्षेत्रावर होणारा परिणामबाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पबेस्टसाठी इलेक्ट्रीक बसेस याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले कीजागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्रात कौशल्य विकास कामे सुरू असून त्याद्वारे क्षमता बांधणीस मदत होत आहे. भविष्यातही अशाचप्रकारे राज्यातील विविध प्रकल्पांना सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

 राज्यातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांपैकी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे पाच हजार गावांना फायदा होत आहे. या प्रकल्पाला जागतिक बॅंकेचे अर्थसहाय्य लाभले असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वीतेनंतर दुसऱ्या टप्प्यास मान्यता देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध होईल तसेच लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेने सहकार्य करावेअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

  यावेळी अपर मुख्य सचिव श्री. कपूरप्रधान सचिव श्रीमती वर्माश्री. गुप्ताश्री. डवले यांनी आपापल्या विभागाच्या प्रकल्पांविषयी माहिती दिली.

Back to top button
error: Content is protected !!