महाराष्ट्र
Trending

बिडकीन: श्रीहरी ट्रेडर्सच्या वजन काट्यावर लिंबु, नारळ व भाकरीचा तुकडा ठेवला ! जादुटोण्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रातून प्रचंड संताप !!

औरंगाबाद, दि. २५ – बिडकीन येथील निलजगाव रोडवरील श्रीहरी ट्रेडर्सच्या वजन काट्यावर लिंबु, नारळ व भाकरीचा तुकडा ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आजही अशा अंधश्रद्धांना खतपाणी घालणार्य घटना घडत असल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ कलम ३ नुसार बिडकीन पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयित आसाराम गंगाराम सर्जे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात तक्रारदार बद्रीनाथ सखाहरी बांडे (वय 62 वर्षे व्यवसाय व्यपार रा. पाडळी ता. पैठण जि. औरंगाबाद ह.मु. विटखेडा औरंगाबाद) यांनी बिडकीन पोलिसांना दिलेली माहिती अशी की, बिडकीन येथे निलजगाव रोडवर गट न. 1083 मध्ये श्रीहरी ट्रेडर्स या नावाचे त्यांचे सिमेट लोखंड दुकान आहे. दुकान नेहमीप्रमाणे सकाळी 09.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत चालु असते.

दुकानावर कधी बद्रीनाथ सखाहरी बांडे, मुलगा कैलास सोयीनुसार असतात. दुकानाच्या पाठीमागे बिडकीन येथील बद्रीनाथ सखाहरी बांडे यांच्या ओळखीचे आसाराम सर्जे यांचा जनावरांचा गोठा आहे. तेथे जनावराना चारा पाणी करण्यासाठी ते येत जात आसतात. मागील दोन महिण्यांपूर्वी कोजागिरी पोर्णीमाच्या दिवशी कोणीतरी बद्रीनाथ सखाहरी बांडे यांच्या दुकानासमोर काळ्या रेषा मारलेले नारळ लिंबु, एक भाकरीचा तुकडा ठेवलेले होते.

धंद्यात नुकसान व्हावे यासाठी ते ठेवलेले होते. त्यानंतर बद्रीनाथ सखाहरी बांडे यांनी दुकानीतील नौकरदारा सदर सामान लगेच काढून टाकले होते. त्यावेळी बद्रीनाथ सखाहरी बांडे यांच्या दुकानामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवलेले नसल्यामुळे लिंबु, नारळ हे कोणी ठेवले ते सहजासहजी कळाले नव्हते. त्यावेळेस कोणतीही तक्रार बद्रीनाथ सखाहरी बांडे यांनी दिलेली नव्हती. दरम्यान, दि. 24/11/2022 रोजी 09.00 वाजेच्या सुमारास बद्रीनाथ सखाहरी बांडे हे घरी आसताना दुकानातील कामगार राजु पठाण (रा. बिडकीन) याने मुलगा कैलास यास फोन करून सांगितले की, आपल्या दुकानासमोरील काट्यावर कोणीतरी काळ्या रेषा व फुल्या असलेले नारळ व लिंबु तसेच एक छोटी भाकरीचा तुकडा ठेवला आहे.

हा फोन आल्यानंतर बद्रीनाथ सखाहरी बांडे यांनी लगेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे मोबाईल फोनवर चेक केले. तेव्हा सीसीटीव्हीमध्ये दि. 23/11/2022 रोजी 22.08 वाजता बद्रीनाथ सखाहरी बांडे यांच्या परिचयाचे बिडकीन येथील आसाराम गंगाराम सर्जे दुकानासमोरील वजन काट्यावर लिंबु नारळ व भाकरीचा तुकडा ठेवताना दिसले.

दरम्यान, याप्रकरणी बद्रीनाथ सखाहरी बांडे यांच्या तक्रारीवरून संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिडकीन पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!