महाराष्ट्र
Trending

जर जरी बक्ष उरूसानिमित्त वाहतूक मार्गात बदल, वेरुळ- खुलताबाद- कन्नड मार्गासाठी असा असेल बदल !!

2 ते 15 ऑक्टोबर दरम्यान जड वाहनासाठी मार्ग बदल

औरंगाबाद, दिनांक 30 : खुलताबाद शहरात जर-जरी-जर बक्ष उरूस साजरा होत असून 9 ऑक्टोबर रोजी चंद्रदर्शना प्रमाणे ईद-ए-मिलाद हा सण साजरा होणार आहे. सदर उर्ससाठी महाराष्ट्रातून 8 ते 10 लाख भाविक आपले खाजगी वाहनाने व इतर वाहनाने हजरत मोहम्मद पैगंबर यांचे पैरहन मुबारक व (मिशीचे केस) याचे दर्शनासाठी येतात.

खुलताबाद हे शहर सोलापूर धुळे राज्य महामार्ग क्र. 52 वर औरंगाबाद ते कन्नड दरम्यान असल्याने मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतुक चालू असते. तसेच जगप्रसिद्ध वेरुळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर सदर महा मार्गावर येत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. याकरीता 2 ऑक्टोबर रोजीचे 2 ते 15 ऑक्टोबर पर्यंत वरील मार्गाने जाणारी सर्व जड वाहतूक खालील मार्गाने वळविण्यात येत आहे.

औरंगाबाद कडून कन्नड धुळेकडे जाणारी सर्व जड वाहने ही दौलताबाद टी. पाँईट – माळीवाडा, कसाबखेडा फाटा वेरुळमार्गे कन्नडकडे जातील. कन्नड कडून येणारी सर्व जड वाहने कन्नड -वेरुळ – कसाबखेडा फाटा, माळीवाडा मार्गे औरंगाबादकडे येतील. फुलंब्रीमार्गे खुलताबाद कन्नडकडे जाणारी सर्व जड वाहने ही औरंगाबाद माळीवाडा, कसाबखेडा फाटा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जातील.

वेरुळ – खुलताबाद – कन्नडकडे जाणारी वाहने कसाबसेडा फाटा, माळीवाडा मार्गे औरंगाबाद कडून फुलंब्री, जळगावकडे जातील.
मनीष कलवानिया पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांनी जड वाहनाची वाहतुक दौलताबाद टी पॉईट पासून घाट, कागजीपुरा ते वेरुळ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!