महाराष्ट्र

बीडचे पोलीस उप निरीक्षक, पोलीस शिपाई लाच घेतना पकडले ! जिल्हा बॅंकेच्या उमापूर शाखेतील शिपायाकडून गणेश उडपी हॉटेलात घेतले 15 हजार !

बीड, दि. 6 – विनयभंगाच्या गुन्हात मदत करण्यासाठी 15 हजारांची लाच घेताना बीडचे पोलीस उप निरीक्षक व पोलीस शिपायाला रंगेहात पकडण्यात आले. जिल्हा बँकेच्या उमापूर शाखेतील शिपायावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासठी लाचेची मागणी करण्यात आली. सुरुवातीला दहा आणि नंतर १५ हजार रुपये गणेश उडपी हॉटेलात घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथील पोलीस उप निरीक्षक राजु भानुदास गायकवाड (वय 53 वर्षे, रा. चक्रधर नगर, बीड), पोलीस शिपाई विकास सर्जेराव यमगर (वय 32 वर्षे रा. जानकीनगर, पिंपरगव्हाण बीड) यांच्यावर लााच घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

जिल्हा बॅंकेचे उमापूर शाखेतील तक्रारदार शिपाई यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, त्यांनी 05/12/2022 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद येथे संपर्क करुन तेथील पथकास बीड येथे बोलावून लेखी तक्रार दिली. तक्रारदार शिपाई दिनांक 16/10/2022 ते 18/10/2022 पर्यंत मुलीच्या परीक्षेमुळे नाशिक येथे होते. दिनांक 27/10/2022 रोजी तक्रारदार शिपाई यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन शिवाजी नगर, बीड येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

गुन्ह्याचा तपास PSI राजु गायकवाड व त्याचे मदतनीस यमगर यांच्याकडे आहे. सदरील गुन्हयामध्ये मदत करण्यासाठी व त्या गुन्हयाचा B FINAL करून देतो अशी मदत करतो असे सांगून 30000/- रुपयाची मागणी केली व 10000/- रुपये दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडून घेतले व त्यानंतर वारंवार फोन करून उर्वरित वीस हजार रुपयाची लाचेची मागणी करीत आहे. सदर गुन्हयात मदत करुन B FINAL चे काम करण्यासाठी उर्वरित 20000/- रुपये लाचेची मागणी केल्यास त्याची पडताळणी करुन सदर लाचेची रक्कम त्यांनी स्वत अथवा इतरामार्फत स्वीकारल्यास त्यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याची तक्रार संबंधित शिपाई यांनी लाचलुचपत विभागाकडे केली.

या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यानुसार तक्रारदार शिपाई यांनी फोनवरुन PSI राजु गायकवाड यांना त्यांना कॉल केला व भेटण्यासाठी कुठे येवू असे विचारले असता त्यांनी एस टी बसस्टड जवळील सागर हॉटेल जवळ येण्यास सांगितले. त्यानुसार पथक एस. टी. बसस्थानक बीड कडे जाणा-या रोडवरील सागर हॉटेल कडे 16.25 वाजता रवाना झाले.

त्यानंतर तक्रारदार शिपायाला PSI राजु गायकवाड यांनी शासकीय आय. टी. आय. येथे येण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार पंच व पथक बीड येथील नगर रोडवरील शासकीय आय. टी. आय. कलेच्या पटांगणात पोहोचले. तेथे यमगर भेटले. आय. टी. आय. कलेजच्या पटांगणात पंचासमक्ष रुपयांच्या देवाण-घेवाणीवर चर्चा झाली. लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर पोलीस उप अधिक्षक गांगुर्डे यांनी सापळा पथक व पंचाना सापळा कारवाई बाबत थोडक्यात माहीती दिली व PSI राजु गायकवाड व यमगर यांनी लाच स्वीकरल्यानंतरचा नियोजित इशारा करण्यास सांगितले.

त्यानंतर तक्रारदार शिपायाने आणलेले पैसे रक्कम 15000/- रुपये 500/- दराच्या 30 चलनी नोटांना पावडर लावून लाचेची रक्कम PSI राजु गायकवाड व यमगर यांना देण्याकरिता ठेवले. त्यानंतर मोटार सायकलने 19.08 वाजता PSI राजु गायकवाड यांनी फोनवर सांगितल्या प्रमाणे बीड मुख्य बसस्थानक समोरील बाजुस असलेले गणेश उडपी हॉटेल येथे रवाना झाले.

तेथे गेल्यानंतर काही वेळाने PSI राजु गायकवाड हे साध्या वेषात व पोलीस शिपाई यमगर हे गणवेशात गणेश उडपी हॉटेल येथे आले. सर्वजण गणेश उडपी हॉटेल मध्ये बसले तेव्हा तेथे कामासंबंधी चर्चा झाली त्यानंतर तक्रारदा शिपायाने 15000/- रुपये PSI राजु गायकवाड यांना दिले. त्यांनी ते स्वीकारुन खिशात ठेवले. त्याचवेळी सापळा पथकाने झडप घालून त्यांना पकडले.

दिनांक 05/12/2022 रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथील पोलीस उप निरीक्षक राजु भानुदास गायकवाड (वय 53 वर्षे, रा. चक्रधर नगर, बीड), पोलीस शिपाई विकास सर्जेराव यमगर (वय 32 वर्षे रा. जानकीनगर, पिंपरगव्हाण बीड) यांच्यावर लााच घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!