महाराष्ट्र
Trending

सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाने खूनाच्या खटल्यात साक्षीचे जबाब टायपिंग करताना फिरवण्यासाठी दीड लाख घेतले !

पुणे, दि. ६ –  खूनाच्या खटल्यात साक्षीचे जबाब टायपिंग करताना बदल करण्यासाठी सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाने दीड लाख घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने या महाभागाला रंगेहात पकडले. सुरुवातीला तब्बल १० लाखांची मागणी केली. पडताळणीत २ लाख व तडजोडीअंती दीड लाख घेतले.

या दीड लाखात पंधरा हजार रुपये चलनी नोटा व एक लाख पस्तीस हजार रुपये नकली नोटा होत्या. सचिन अशोक देठे, वय ३९ वर्षे, पद – वरिष्ठ लिपिक, सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे) असे आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यावर झेरॉक्स दुकाना समोर त्यास पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदारांचे मावसभावाचे विरूद्ध दाखल असलेल्या खून व मोका केसचा खटला सत्र न्यायालय, शिवाजीगनर पुणे येथे सुरू आहे. खटल्याच्या साक्षीचे जाबजबाब टायपिंग करताना आवश्यक ते बदल करून त्या केसमधून सुटकेसाठी मदत करतो असे सांगून वरिष्ठ लिपिक सचिन देठे यांनी १०,००,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने ला.प्र.वि. पुणे येथे दिली.

या तक्रारीची पडताळणी केली असता वरिष्ठ लिपिक सचिन देठे यानी २,००,०००/- लाख रूपयांची लाचेची मागणी केली व त्यापैकी १,५०,०००/- रूपये स्वीकारल्यावर ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ला. प्र. वि. पुणे युनिटच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक अमोल सांबे, सा.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Back to top button
error: Content is protected !!