महाराष्ट्र
Trending

कर्नाटकचे भ्याड हल्ले खपवून घेणार नाही ! महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी: अजित पवारांनी सुनावलं

महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला - अजित पवार

Story Highlights
  • अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी...
  • कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवरील भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून निषेध

मुंबई, दि.६ डिसेंबर – मराठी भाषिक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. अशा भ्याड हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत.

असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारने खपवून  घेऊ नयेत. महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी असे आवाहनही अजित पवार यांनी सरकारला केले.

Back to top button
error: Content is protected !!