महाराष्ट्र
Trending

ग्रामीण भागामध्ये बँकेच्या सुविधा पोहचविण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर बँक कोऑर्डिनेटर सखी कार्यरत !

महिलांच्या डिजिटल आर्थिक साक्षरतेकरिता जागतिक महिला बँकेसोबतचा सामंजस्य करार उपयुक्त – डॉ.हेमंत वसेकर

Story Highlights
  • या बी.सी. सखी ग्रामीण भागातील लोकांना बँकेतून पैसे काढणे, बील भरणा करणे व विविध विमा योजना यासारख्या सुविधा घरपोच पोहोचविते. या सुविधामधून बी. सी. सखीना बँकेद्वारे उपजीविकेच्या संधी प्राप्त होतात.  महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामीण व्यक्तीला बँकेच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात याकरिता या सखी कार्यरत करण्यात येत आहे.

 मुंबईदि. 25 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जागतिक महिला बँक यांच्यामध्ये काल महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. या करारामुळे उमेद अभियानांतर्गत कार्यरत सर्व ग्रामीण महिला आर्थिक साक्षर होऊन सक्षम होण्यास मदत होणार आहेअसे प्रतिपादन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी केले.

जागतिक महिला बँकेच्या क्षेत्रीय प्रमुख श्रीमती कल्पना अजयन आणि इतर सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार नवी मुंबई येथील सिडको कव्हेन्शन सेंटर येथे झालात्याप्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण व दुर्बल भागामध्ये बँकेच्या सुविधा पोहचविण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर बी. सी. (बँक कोऑर्डिनेटर) सखी कार्यरत करण्यात येत आहे. या बी.सी. सखी ग्रामीण भागातील लोकांना बँकेतून पैसे काढणेबील भरणा करणे व विविध विमा योजना यासारख्या सुविधा घरपोच पोहोचविते. या सुविधामधून बी. सी. सखीना बँकेद्वारे उपजीविकेच्या संधी प्राप्त होतात.  महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामीण व्यक्तीला बँकेच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात याकरिता या सखी कार्यरत करण्यात येत आहे.

हा उपक्रम जलद गतीने होण्याकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे जागतिक महिला बँकेसोबत सामंजस्य करार करण्यात करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ.वसेकर यांनी या करारामुळे राज्यभरातील अभियानाला जोडलेल्या महिलांची आर्थिक साक्षरता वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीने ग्रामीण महिलांची कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहेअसे प्रतिपादन केले.

जागतिक महिला बँकेच्या क्षेत्रीय प्रमुख श्रीमती कल्पना अजयन यांनी उमेद अभियानाच्या चळवळी सोबत काम करून ग्रामीण महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची ही संधी असल्याचे सांगितले.

सदर कराराच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकरअतिरिक्त संचालक परमेश्वर राऊतधनवंत माळीराज्य व्यवस्थापकश्रीमती कावेरी पवारअभियान व्यवस्थापकश्रीमती धनश्री बिरंबोले तसेच जागतिक महिला बँकेकडून श्रीमती कल्पना अजयनविभागीय प्रमुख श्रीमती पल्लवी मधोकसंचालकअजित अग्रवालप्रवीण वानखडे व नारायण खोसे उपस्थित होते. 

Back to top button
error: Content is protected !!