महाराष्ट्र
Trending

मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिकांसह सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा !

महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन सादर

औरंगाबाद, दि. 17 : महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याकडे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये ०१ नोंव्हेबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना बंद करून काही काळ डीसीपीएस योजना चालु करण्यात आली होती. ती ही योजना बंद करुन त्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेंशन योजना चालु करण्यात आलेली आहे. ०१ नोंव्हेंबर २००५ पुर्वी जे मान्यताप्राप्त आहेत व ज्यांना टप्पा अनुदान होते असे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, शिपाई यांना जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते.

आपल्या देशामध्ये राजस्थान, झारखंड, छत्तीसगड या राज्यामध्ये जुनी पेंशन योजना लागू करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन थेट राज्यपालांना सादर करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन मुंबई यथे निवेदन सादर केले.

आपल्या देशात जवळपास 5 ते 7 राज्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला जुनी पेन्शन योजना लागू करून आपल्या कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. यावेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य शाहरुख पठाण, सय्यद अब्दुल रहीम, सदस्य शेख अलीम आदींची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!